भाजपा भूमिपुत्रालाच मुख्यमंत्री करणार, पंतप्रधान मोदींचे पश्चिम बंगालमध्ये आश्वासन

पश्चिम बंगालच्या भूमीने वंदे मातरमच्या माध्यमातून देशाला एकत्र आणलं, पण मुख्यमंत्री ममता बॅनर्जी लोकांना बाहेरचे असं संबोधित करत आहेत. भाजपा सत्तेत आल्यास येथील भुमीपूत्रालाच मुख्यमंत्री करणार असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहे. BJP will make Bhumiputra the Chief Minister, Prime Minister Modi’s assurance in West Bengal


विशेष प्रतिनिधी

कोलकत्ता : पश्चिम बंगालच्या भूमीने वंदे मातरमच्या माध्यमातून देशाला एकत्र आणलं, पण मुख्यमंत्री ममता बॅनर्जी लोकांना बाहेरचे असं संबोधित करत आहेत. भाजपा सत्तेत आल्यास येथील भुमीपूत्रालाच मुख्यमंत्री करणार असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहे.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जींवर निशाणा साधला. ते म्हणाले, बंगाल ही रवींद्रनाथ टागोर, सुभाषचंद्र बोस, बंकीमचंद्र चॅटर्जी अशा महान लोकांची जमीन होती आणि येथे कोणताही भारतीय बाहेरचा नव्हता. बंगालने वंदे मातरमच्या माध्यमातून देशातील जनतेला एकत्र आणलं. पण ममतादीदी बाहेरील लोक असा उल्लेख करत आहेत. कोणताही भारतीय येथे बाहरेचा नव्हता, सर्व भारतमातेची मुलं आहेत.पंतप्रधान म्हणाले, आम्हाला पर्यटक बोललं जात आहे, खिल्ली उडवली जात आहे, अपमान केला जात आहे. दीदी रवींद्रनाथ टागोरांच्या बंगालमधील लोक कोणालाही बाहेरचा समजत नाहीत.
ममता बॅनर्जी सतत बंगालमध्ये दिल्ली किंवा गुजरातमधून आलेल्या बाहेरच्या लोकांना राज्य करु देणार नाही असं सांगत आहेत. त्यालाच नरेंद्र मोदींनी उत्तर दिलं आहे.

BJP will make Bhumiputra the Chief Minister, Prime Minister Modi’s assurance in West Bengal

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*