एका शहरातून १०० कोटींची वसूली, तर… मला तोंड नका उघडायला लावू!!; ज्योतिरादित्य शिंदेंचा राज्यसभेत काँग्रेस खासदारांना इशारा

वृत्तसंस्था

नवी दिल्ली – काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या ज्योतिरादित्य शिंदे यांनी राज्यसभेत वित्त विधेयकावर बोलताना आपल्या जुन्या पक्षाच्या सहकाऱ्यांना चांगलेच सुनावले. तुमचे गृहमंत्री एका शहरातून १०० कोटींची वसूली करतात, तर… बाकीच्या शहरांमधून…किती… मला उगाच तोंड उघडायला लावू नका, अशा शब्दांमध्ये ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस खासदारांना भर सभागृहात ठणकावले.  BJP MP Jyotiraditya Scindia takes on congress MPs over anil deshmukh 100 cr. extortion

ज्योतिरादित्य शिंदे सरकारची बाजू मांडताना आकडेवारीचा आधार घेऊन एनडीए आणि यूपीए सरकारची तुलना सभागृहात मांडली. त्या यूपीए सरकारमध्ये ज्योतिरादित्य मंत्री होते.काँग्रेसच्या खासदारांनी पेट्रोल – डिझेलच्या भाववाढीवरून सरकारला घेरले होते. त्यांना प्रत्युत्तर देताना ज्योतिरादित्य म्हणाले, की मला तोंड उघडायला लावू नका. पब आणि रेस्तराँमधून १०० कोटींची वसुली केली जातेय आणि ती सुद्धा थेट गृहमंत्र्यांकडून… एका शहराचा दर १०० कोटी रुपये आहे, तर बाकीच्या… असे म्हणत त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.

इंधनाचे दर वाढले आहेत हे जरी सत्य असले तरी लोकांच्या डोळ्यात धूळ फेकायचीही मर्यादा असते असे सांगून ज्योतिरादित्य म्हणाले, की पेट्रोल-डिझेलच्या किंमतींवरील खर्च वजा केल्यानंतर राज्यांना ४० टक्के तर केंद्राला ६० टक्के पैसे मिळतात. त्या ६० टक्क्यांपैकीही ४२ टक्के केंद्राकडून राज्यांना परत जातात. त्यामुळे राज्यांना एकूण टक्क्यांपर्यंत पैसे मिळतात तर केंद्राकडे केवळ ३६ टक्के असतात, असे स्पष्टीकरण ज्योतिरादित्य शिंदेंनी दिले.

त्यातही महाराष्ट्रात इंधनाचे दर सर्वाधिक असल्याचे आणि तेथेच कर जास्त असल्याचे ज्योतिरादित्य यांनी लक्षात आणून दिले.

BJP MP Jyotiraditya Scindia takes on congress MPs over anil deshmukh 100 cr. extortion

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*