विशेष प्रतिनिधी
पणजी : गोव्यात जिल्हा पंचायत निवडणुकीपाठोपाठ भाजपने स्वराज्य संस्थांवरही विजयाचा झेंडा रोवला आहे. राज्यातील सहा नगरपरिषदांपैकी कुंकळ्ळी वगळता इतरत्र भाजप पुरस्कृत उमेदवारांनी विरोधकांचा धुव्वा उडवून विजयश्री खेचून आणली आहे.मात्र, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा मतदारसंघ असलेल्या पणजी महापालिकेतील पोटनिवडणुकीत भाजप पुरस्कृत उमेदवार पराभूत झाला. Bjp bags election in Goa once again
पणजी महापालिकेत भाजप पुरस्कृत आमदार बाबुश मोन्सेरात यांचे ‘टुगेदर फॉर अ प्रोग्रेसिव्ह पणजी पॅनल’चे २५, सर्वपक्षीय पुरस्कृत ‘आम्ही पणजीकार’ पॅनलचे ४ तर एकजण अपक्ष निवडून आला. वाळपई नगरपरिषदेत मंत्री विश्वलजित राणे यांच्या भाजप पुरस्कृत पॅनेलमधील १० पैकी ९ जण विजयी झाले. कुडचडे – काकोडा नगरपरिषदेत १५ पैकी ८ भाजप पुरस्कृत उमेदवार तर ७ अपक्ष निवडून आले. डिचोलीमध्ये १५ पैकी ९ जागा भाजप पुरस्कृत गटाला मिळाल्या.