भाजप @ 43 : आजपासून प्रत्येक बुथच्या भिंतींवर पक्षाच्या घोषणा; पंतप्रधान मोदी कार्यकर्त्यांना करणार संबोधित


प्रतिनिधी

नवी दिल्ली : आज भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस आहे. 43 वर्षांपूर्वी 6 एप्रिल 1980 रोजी भाजपची स्थापना झाली. 44व्या स्थापना दिनानिमित्त भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी दिल्लीतील भाजप मुख्यालयात पक्षाचा ध्वज फडकावला. लखनऊमध्येही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पक्ष कार्यालयावर ध्वजारोहण केले.BJP @ 43 Party slogans on walls of every booth from today; Prime Minister Modi will address the workers

यावेळी पक्ष आपला स्थापना दिवस खास बनवणार आहे. भाजप नेते आजपासून देशातील सर्व बूथवर पक्षाच्या घोषणा लिहिणार आहेत. जेपी नड्डा दिल्लीतील एका बूथपासून याची सुरुवात करणार आहेत. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी 9.45 वाजता कार्यकर्त्यांना व्हर्च्युअली संबोधित करतील. 10 लाख ठिकाणी भाषण दाखवले जाणार आहे. पक्षाने आपल्या सर्व खासदारांना गुरुवारी संसदेत येण्यास सांगितले आहे.



स्थापना दिवसापासून आंबेडकर जयंतीपर्यंतचा विशेष आठवडा

भाजप आजपासून 14 एप्रिलपर्यंत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती विशेष सप्ताह म्हणून साजरी करणार आहे. पक्षाने कार्यकर्त्यांना 11 एप्रिल रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आणि 14 एप्रिल रोजी डॉ. आंबेडकर यांची जयंती सर्व बूथ, मंडळ, जिल्हा आणि राज्य कार्यालयात साजरी करण्यास सांगितले आहे. त्यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून स्वच्छता अभियान राबवावे तसेच मोदी सरकारने अनुसूचित समाजाच्या कल्याणासाठी केलेल्या योजनांची माहिती देण्यास सांगितले आहे.

BJP @ 43 Party slogans on walls of every booth from today; Prime Minister Modi will address the workers

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात