विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ उभी करत त्यांना धमकीचे पत्र लिहिल्या प्रकरणी मुंबई पोलिस अधिकारी सचिन वाझे राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या ताब्यात आहेत. BIG BREAKING : The story of Scorpio: Who planted the Scorpio outside Ambani’s house? Finally the NIA did the unraveling
एनआयए सतत सचिन वाझेंची चौकशी करत असून आतापर्यंत या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. एवढेच नव्हे तर या प्रकरणाची झळ थेट महाविकास आघाडी सरकारपर्यंत पोहोचली आहे. मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कुणी लावली? एनआयएने आता हेच उघड केले आहे.
एनआयएने अशी माहिती दिली आहे की मुकेश अंबानी यांच्या घराजवळ जिलेटिनच्या काड्यांनी भरलेली स्कॉर्पिओ सचिन वाझेंच्या वयक्तिक ड्रायव्हरने उभी केली होती.
स्कॉर्पिओच्या मागे दिसणारी इनोव्हा गाडी स्वत: वाझे चालवत असल्याचेही एनआयएने सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार स्कॉर्पिओची कहाणी 17 फेब्रुवारीपासून सुरू झाली जेव्हा त्याचा मालक मनसुख हिरेनने मुलुंड-ऐरोली रोडवर स्कॉर्पिओ पार्क केली आणि कार खराब झाल्याचा दावा केला. हिरेन म्हणाले होते की कारमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता . मात्र हिरेन यांनी त्याच दिवशी शहर पोलिस मुख्यालयात जाऊन वाझे यांना स्कॉर्पिओची चाबी दिली होती.
दुसर्या दिवशी वाझे यांच्या वयक्तिक ड्रायव्हरने तेथून गाडी ठाण्याला नेली.आणि त्यानंतर साकेत हाऊसिंग सोसायटी येथे उभी केली.
एका अधिकार्याने दिलेल्या माहितीनुसार, ‘वाझे स्वत: स्कॉर्पिओच्या मागे इनोव्हा चालवत होते. अँटिलीयाजवळ कार सोडल्यानंतर ड्रायव्हर देखील त्याच इनोव्हामध्ये बसला जी वाझे चालवत होते, त्यानंतर ते दोघे निघून गेले. ही इनोव्हा दुसर्या नंबर प्लेटसह अँटिलियाजवळ काही वेळानंतर पुन्हा दिसली. यानंतर कुर्ता-पायजामा परिधान करुन सचिन वाझे यांनी स्कॉर्पिओकडे जाऊन त्यात धमकीचे पत्र ठेवले.