रेल्वे प्रवासात रात्रीच्या वेळी मोबाईल, लॅपटॉप चार्ज करण्यास बंदी

आगीच्या घटनांना रोखण्यासाठी भारतीय रेल्वेने नियमांमध्ये  मोठा बदल केला आहे. रेल्वे प्रवासी रात्रीच्या वेळी मोबाईल, लॅपटॉप चार्ज करू शकणार नाहीत. Ban on charging mobiles and laptops at night on train journeys


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: आगीच्या घटनांना रोखण्यासाठी भारतीय रेल्वेने नियमांमध्ये  मोठा बदल केला आहे. रेल्वे प्रवासी रात्रीच्या वेळी मोबाईल, लॅपटॉप चार्ज करू शकणार नाहीत.

रेल्वे प्रवासादरम्यान घडणाºया आगीच्या घटना टाळण्यासाठी रेल्वेने हा निर्णय घेतला आहे.  प्रवाशांची सुरक्षा लक्षात घेऊन रेल्वेनं हा निर्णय घेतल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली. त्यामुळे रात्री ११ ते पहाटे ५ दरम्यान रेल्वे गाड्यांमधील चार्जिंग पॉईंट बंद राहतील. त्यामुळे प्रवाशांना त्यांचा वापर करता येणार नाही.१३ मार्चला दिल्ली-देहरादून शताब्दी एक्स्प्रेसमध्ये भीषण आग लागली होती. एका डब्यात लागलेली आग बघता बघता सात डब्यांपर्यंत पोहोचली. यामध्ये सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं. या घटनेनंतर रेल्वेनं सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाची पावले उचलली आहेत.

धुम्रपानाविरोधातले नियमदेखील रेल्वेकडून आणखी कठोर करण्यात येणार आहेत. रेल्वेत धुम्रपान करणाºयांकडून सध्या कलम १६७ च्या अंतर्गत केवळ १०० रुपये दंड आकारला जातो. हा दंड वाढवण्याचा रेल्वेचा विचार आहे. रेल्वे गाड्या किंवा रेल्वे स्थानकांच्या परिसराात धुम्रपान करणाऱ्यांसाठी थेट तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद करण्याचा विचारदेखील सुरू आहे.

Ban on charging mobiles and laptops at night on train journeys

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*