सुमन कल्याणपूर यांना पद्मभूषण किताब प्रदान, एस. एम. कृष्णा, कुमार मंगलम बिर्ला यांच्यासह अन्य मान्यवरांचाही सन्मान


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : प्रख्यात पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांना आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पद्मभूषण किताब प्रदान केला. त्याचबरोबर अन्य मान्यवरांचाही त्यांनी सन्मान केला. राष्ट्रपती भवनात झालेल्या सोहळ्यात अनेक मान्यवरांना पद्म किताबाने सन्मानित करण्यात आले. यामध्ये माजी परराष्ट्रमंत्री कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान भाजपचे नेते एस. एम. कृष्णा यांना पद्मविभूषण, तर प्रख्यात उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला यांना पद्मभूषण किताबाने सन्मानित करण्यात आले.Awarded Padma Bhushan to Suman Kalyanpur, S. M. Krishna, Kumar Mangalam Birla and other dignitaries were also honoured



त्याचबरोबर अनेक लोक कलावंत पारंपरिक चित्रशैलीचे चित्रकार यांचाही पद्मश्री किताब देऊन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सन्मान केला आहे.

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांना पद्मविभूषण हा किताब मरणोत्तर जाहीर झाला आहे.

 

Awarded Padma Bhushan to Suman Kalyanpur, S. M. Krishna, Kumar Mangalam Birla and other dignitaries were also honoured

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात