राहुल गांधींवर न्यायालय अवमाननेचा खटला दाखल चालविण्यास मोदी सरकारचा नकार!

न्यायालयाच्या अवमानना प्रकरणी कॉँग्रेसचे खासदार राहूल गांधी यांच्यावर खटला दाखल करण्यास केंद्र सरकारच्या वतीने अ‍ॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी नकार दिला आहे. न्यायसंस्थेबाबतचे त्यांचे विधान हे खूपच संदिग्ध आहे, असे वेणुगोपाल यांनी म्हटले आहे. Attorney General refuses to file contempt of court case against Rahul Gandhi


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : न्यायालयाच्या अवमानना प्रकरणी कॉँग्रेसचे खासदार राहूल गांधी यांच्यावर खटला दाखल करण्यास केंद्र सरकारच्या वतीने अ‍ॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी नकार दिला आहे. न्यायसंस्थेबाबतचे त्यांचे विधान हे खूपच संदिग्ध आहे, असे वेणुगोपाल यांनी म्हटले आहे.

राहूल गांधी यांनी एका मुलाखतीत न्यायालयांबाबत अवमानकारक विधान केले होते. राहूल गांधी यांनी या मुलाखतीत म्हटले होते की देशात पूर्वी २०० टक्के अभिव्यक्ती स्वातंत्र्य असणारी न्यायव्यवस्था होती. मात्र, भारतीय जनता पक्ष या संस्थांमध्ये आपले लोक घुसविण्याचा प्रयत्न करत आहेत. देशाची संस्थात्मक चौकटच तोडण्याचे काम ते करत आहेत. 

यावर दिल्लीतील एक वकील विनित जिंदाल यांनी याबाबत वेणुगोपाल यांना पत्र लिहून राहूल गांधी यांच्यावर अवमानना प्रकरणी खटला दाखल करण्याची मागणी केली होती. जिंदाल यांनी म्हटले आहे की कॉँग्रेसचे नेते राहूल गांधी यांनी न्यायव्यवस्थेचा अपमान केला आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे न्यायव्यस्थेचा गौरव कमी झाला आहे.

मात्र, वेणुगोपाल यांनी म्हटले आहे की राहूल गांधी यांचे हे वक्तव्य अगदी संदिग्ध आहे. त्यांनी सर्वोच्च न्यायालय किंवा न्यायमूर्तींचे नाव घेतलेले नाही. त्यामुळे माझ्याकडून खटला दाखल करण्यास मान्यता दिली जाऊ शकत नाही.

Attorney General refuses to file contempt of court case against Rahul Gandhi

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*