राहुल गांधींची आसाममध्ये कामाख्या दर्शन यात्रा; प्रियांकांचा केरळमध्ये शांतता आणि सौहार्द मंत्रालय स्थापनेचा नारा

वृत्तसंस्था

नवी दिल्ली – काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी आणि प्रियांका गांधी हे स्टार प्रचारक विधानसभा निवडणूकीच्या झंझावाती प्रचार दौऱ्यासाठी बाहेर पडले असून राहुलजींनी आसाममध्ये कामाख्या देवीचे दर्शन घेऊन प्रचार दौऱ्याची सुरूवात केली आहे. तर प्रियांका गांधी या केरळच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी चलकडुड्डी येथील सभेला संबोधित केले आहे. Assam: Congress leader Rahul Gandhi offers prayers at Kamakhya Temple in Guwahati, priyanka gandhi in keralaपंतप्रधान नरेंद्र मोदींनी बांगलादेशात जाऊन मंदिर भेटी – दर्शन कार्यक्रम केला. राहुलजी आता आसाममध्ये तो कार्यक्रम फॉलो करताहेत. कामाख्या मंदिरातील दर्शनाच्या वेळी त्यांच्या समवेत गौरव गोगई हे होते. ते आसाममध्ये काँग्रेसचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार मानले जात आहेत.

एकीकडे राहुलजींचे टेम्पल रन सुरू झालेले असताना प्रियांका गांधी यांनी केरळमध्ये शांतता आणि सौहार्दाचा नारा दिला आहे. एलडीएफच्या राजवटीच्या काळात केरळमध्ये शांतता आणि सौहार्द बिघडले आहे. समाजा – समाजांमध्ये तेढ निर्माण झाली आहे. ही तेढ संपविली पाहिजे. एलडीएफच्या राजवटीत राजकीय हत्यांचे प्रमाण वाढले आहे. अशा हत्या पूर्णपणे थांबल्या पाहिजेत. यासाठी एलडीएफची सत्ता जाऊन यूडीएफची सत्ता आल्यावर राज्यात शांतता आणि सौहार्द मंत्रालय निर्माण करण्यात येईल, अशी घोषणाच प्रियांका गांधी यांनी केली.

मध्यंतरी केंद्र सरकारमध्ये स्वतंत्र मत्स्यव्यवसाय मंत्रालय आहे अथवा नाही यावरून राहुल गांधींचा राजकीय गोंधळ उडाला होता. आता केरळमध्ये जाऊन प्रियांका गांधी यांनी स्वतंत्र शांतता आणि सौहार्द मंत्रालय निर्माण करण्याची घोषणा केली आहे.

वास्तविक याच कामासाठी गृह मंत्रालय सा संकल्पेनेची निर्मिती झाली आहे आणि वर्षानुवर्षे गृह मंत्रालय प्रत्येक राज्यात अस्तित्वात आहे. अंतर्गत शांतता राखणे हेच त्याचे मुख्य काम आहे. मात्र, प्रियांका गांधी यांना त्याचा विसर पडलेला दिसतो.

Assam: Congress leader Rahul Gandhi offers prayers at Kamakhya Temple in Guwahati, priyanka gandhi in kerala

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*