पठडी सोडून जनतेपर्यंत अभिनव मार्गाने पोहोचा; पंतप्रधान मोदींचे भाजप खासदारांना आवाहन; पण कसे? ते वाचा…!!


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : जनतेपर्यंत अभिनव मार्गाने पोहोचण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या सर्व खासदारांना केले आहे. भाजपच्या सर्व खासदारांच्या संसदीय पक्षाची बैठक आज झाली. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदारांना विविध अभिनव उपक्रम राबविण्याचे आवाहन केले.Arrange live samvad with padma awardies, PM Modi tells BJP MPs


KASHI :१३ डिसेंबरला काशी विश्वनाथ कॉरिडॉरचे उद्घाटन ; काशी विश्वेश्वर मंदिर-राणी अहिल्यादेवी होळकरांचं योगदान-पंतप्रधान मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट …


यामध्ये हिवाळ्याच्या मोसमात योगासने, सूर्यनमस्कार, विविध भारतीय खेळांचे प्रकार यांच्या स्पर्धांचे मोठ्या प्रमाणावर आयोजन त्याचबरोबर त्याचबरोबर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना बरोबर पद्म किताबाने सन्मानित विविध मान्यवरांचे लाईव्ह संवाद आयोजित करण्यावर भर देण्यास मोदींनी खासदारांना सांगितले आहे.

यामधून केंद्र सरकारने पद्म सन्मान नेमके कोणाला दिले आहेत ते समजेल आणि त्या सन्मानित व्यक्तींकडून प्रेरणा मिळेल, असे मोदी म्हणाले. यंदा पाचशेहून अधिक पद्म सन्मान समाजामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या सर्वसामान्य व्यक्ती म्हणून निवड करून देण्यात आले आहेत. या सर्व व्यक्ती आपापल्या क्षेत्रात अतिशय समरसतेने काम करत आहेत परंतु त्यांची फारशी ओळख देशाला नाही. ती ओळख महाविद्यालय तसेच शालेय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली की यातले वेगळेपण त्यांच्या मनावर ठसेल. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर भारतीय खेळांचे महोत्सव आयोजित केले की या खेळांना देखील प्रोत्साहन मिळेल आणि समाजामध्ये वेगळा संदेश जाईल, असे मोदी म्हणाले.

पठाडीबद्ध संपर्काच्या पलिकडे जाऊन हे अभिनव उपक्रम राबविले तर भविष्यात देखील मतदार संघ बांधणीच्या दृष्टीने आणि जनसंपर्काच्या दृष्टीने वेगळी नावे समोर येतील आणि मनुष्यबळ उपलब्ध होईल, असेही मोदींनी बोलून दाखविले. संसदीय पक्षाच्या बैठकीत विषयीची माहिती संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली.

Arrange live samvad with padma awardies, PM Modi tells BJP MPs

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात