पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाचा घोळ; अजून निर्णय नाही, दोन-तीन तास थांबा – सुखजिंदर सिंग रंधवा; मंत्रिपदांसाठी आमदारांमध्ये रस्सीखेच


वृत्तसंस्था

चंडीगढ : पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचा घोळ अजून काँग्रेस श्रेष्ठींना सोडविता आलेला नाही. काँग्रेसच्या आमदारांनी मिळून सुखजिंदर सिंग रंधवा यांच्या नावाची मुख्यमंत्रिपदासाठी शिफारस केली असली तरी अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. दोन-तीन तास थांबा, असे दस्तुरखुद्द सुखजिंदर सिंग यांनी पत्रकारांना सांगितले आहे. announcement will be made today: Congress leader Sukhjinder Singh Randhawa

मुख्यमंत्री पदापासून ते उपमुख्यमंत्रीपदे तसेच अन्य मंत्रीपदावर घोळ सुरू असल्याचे समजत आहे. उपमुख्यमंत्रीपदे हिंदू आणि दलित नेत्याला देण्यावर एकमत झाल्याचे सांगण्यात येते. परंतु ते नेमके कोण असावेत याविषयी पक्षात मतभेद असल्याचे समजते.

तसेच अमरिंदर सिंग यांच्या मंत्रिमंडळातील कोणत्या मंत्र्यांना ठेवायचे आणि वगळायचे यावरही घोळ सुरू आहे. मंत्रीपद मिळवण्यासाठी अनेक आमदारांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे.

त्यामुळेच सुखजिंदर सिंग रंधवा यांनी राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्या भेटीची वेळ मागितली असली तरी अजून दोन-तीन तास थांबा अंतिम निर्णय झालेला. नाही, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले आहे त्यामुळे कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी राजीनामा दिल्यानंतर चोवीस तास उलटून गेले तरी काँग्रेस श्रेष्ठींना पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचा घोळ सोडवता आलेला नाही हे स्पष्ट झाले आहे.

त्याच बरोबर राज्यात कॅप्टन अमरिंदरसिंग आणि नवज्योत सिंग सिद्धू यांच्या मध्ये जबरदस्त शाब्दिक युद्ध सुरु आहे. यामध्ये कोणी कोणाशी शैय्यासोबत केली पर्यंत भाषा खालच्या स्तराची येऊन ठेपली आहे.

announcement will be made today: Congress leader Sukhjinder Singh Randhawa

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात