ऐतिहासिक निर्णय, गुलामीचे पुसले चिन्ह; राष्ट्रपती भवनाच्या मुघल गार्डनचे नामांतर अमृत उद्यान!!


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : ऐतिहासिक निर्णय, गुलामीचे पुसले चिन्ह; राष्ट्रपती भवनाच्या मुघल गार्डनचे नामांतर अमृत उद्यान!! असे आज घडले आहे!! भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात भारताच्या राष्ट्रपती भवनाच्या मुघल गार्डनचे नामांतर करण्याचा ऐतिहासिक निर्णय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज शनिवार 28 जानेवारी 2023 रोजी जाहीर केला आहे. amrit udyan is new name for mughal gardens in rashtrapati bhavan historic

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात राजधानी दिल्लीतली गुलामीची आणखी एक खूण पुसली गेली आहे. केंद्रातील मोदी सरकारने राजपथाचे नामांतर कर्तव्य पथात करून एक महत्त्वाची गुलामीची खूण आधीच पुसली आहे आणि आता राष्ट्रपती भवनाच्या मुघल गार्डनचे नामांतर अमृत उद्यान असे करून मुघल काळातली गुलामीची खूण पुसली आहे. राष्ट्रपतींच्या डेप्युटी प्रेस सेक्रेटरी नाविका गुप्ता यांनी राष्ट्रपतींच्या वतीने मुघल गार्डनच्या नामांतराची घोषणा केली आहे. त्याचवेळी या अमृत गार्डन संदर्भात काही विशिष्ट धोरणे बदलली असून आता 31 जानेवारी ते 26 मार्च या कालावधीत हे जनसामान्यांसाठी खुले करण्याची घोषणाही केली आहे यातले काही दिवस विशेषत्वाने शेतकरी, महिला आदींसाठी राखीव असतील.

राष्ट्रपती भवनाच्या अधिकृत वेब पोर्टलवर आता या नामांतराचे अपडेटेशन झाले असून अमृत उद्यान असे नामकरण वेब पोर्टलवर दिसत आहे.

मुघल गार्डन आले कसे अस्तित्वात??

सध्याच्या अमृत उद्यानाची म्हणजेच मुघल गार्डनची मूळ संकल्पना ब्रिटिशांनी स्वातंत्र्यपूर्वकाळात अस्तित्वात आणली. त्यावेळी राष्ट्रपती भवन व्हाईसरॉय पॅलेस म्हणून ओळखले जायचे. त्यामुळे व्हाईसरॉय पॅलेस भोवतीची बाग म्हणून 15 एकर परिसरात मुघल गार्डन विकसित करण्यात आले. जम्मू कश्मीर मधले मुघल गार्डन आणि ताजमहाल भोवतीचे गार्डन या प्रेरणेतून सर एडविन ल्यूटीयन यांनी व्हाईसरॉय पॅलेस भोवतीच्या मुघल गार्डनची रचना 1917 मध्ये अंतिम केली होती.

मात्र, प्रत्यक्ष काम 1928 – 29 मध्ये झाले. हॉर्टिकल्चरिस्ट विल्यम मस्टो यांनी त्या उद्यानात वृक्ष लागवड केली. मुघल गार्डन बांधताना मुघल शैलीतील कालवे आणि ब्रिटिश शैलीतील उद्यान रचनेचा मिलाफ साधण्याचा प्रयत्न या दोघांनी केला. यासाठी युरोप मधून विविध फुलांची रोपे भारतात आणून त्याची कलमे मुघल गार्डन मध्ये लावली आणि विकसित केली. त्याचबरोबर युरोपियन पद्धतीचे लॉन देखील तेथे विकसित केले.

आता हेच ऐतिहासिक मुघल गार्डन भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात आणि नंतरही अमृत उद्यान म्हणून ओळखले जाणार आहे. भाजपसह अनेकांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.

amrit udyan is new name for mughal gardens in rashtrapati bhavan historic

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात