पैकीच्या पैकी : काव्याने रचला इतिहास ; JEE मुख्य परिक्षा 2021 मध्ये शंभर टक्के गुण ; ठरली पहिली महिला विद्यार्थी

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : दिल्लीच्या काव्या चोप्राने (Kavya Chopra) इतिहास घडवला आहे. काव्याने Joint Entrance Examination (JEE) मुख्य 2021 मध्ये केवळ शंभर टक्के गुण मिळवले नाहीत तर अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेत 300 पैकी 300 गुण मिळविणारी ती पहिली महिला विद्यार्थी ठरली आहे. चोप्राने फेब्रुवारी महिन्यात दिलेल्या परीक्षेत 99.9 टक्के गुण मिळवले होते, त्यात सुधारणा करत आता तिला 100 टक्के गुण मिळाले आहेत. ती आता आयआयटी प्रवेश परीक्षा- JEE Advanced 2021 ची तयारी करत आहे. Among them: History composed by poetry; One hundred percent marks in JEE Main Exam 2021; Became the first female student

रंजक बाब म्हणजे काव्या तिच्या 99.9 टक्के गुणांवर नाखूश होती. तिच्या 99.9 टक्के गुणांच्या आधारेही ती जेईई अ‍ॅडव्हान्स्डसाठी पात्र ठरली असती. पण ती यावर समाधानी नव्हती आणि तिला असा विश्वास होता की आणखी चांगली कामगिरी तिला करता येईल.कोटाच्या अ‍ॅलन कोचिंग संस्थेची ही विद्यार्थिनी आता आयआयटी-दिल्ली (IIT-Delhi) किंवा आयआयटी-बॉम्बेमधून (IIT Bombay) संगणक शास्त्राचा (computer science) अभ्यास करण्याचे लक्ष्य उराशी बाळगून आहे. ‘मला गणिताची आवड आहे आणि संगणक विज्ञान हे गणिताचे अॅप्लिकेशन आहे आणि यामध्ये आर्थिकदृष्ट्या स्थिर करिअर देखील आहे.’

काव्याने तिच्या यशानंतर अशी प्रतिक्रिया दिली आहे की, तिला नेहमीच बरोबरीच्या संधी मिळाल्या पण भारतातील मुलींना कोणत्या समस्येला सामोरे जावे लागते याची तिला कल्पना आहे. काव्याने अशी प्रतिक्रिया दिली की, ‘मला आणि माझ्या भावाला माझ्या पालकांनी बरोबरीची वागणूक दिली. माझ्या लिंगानुसार वैयक्तिकरित्या माझ्याशी कधीही भेदभाव केला नाही पण मला ठाऊक आहे की भारतातील बर्‍याच मुलींना इतका विशेषाधिकार दिला जात नाही. जरी माझ्याशी कधीही भेदभाव केला गेला नाही, तरीही इतर मुली कोणत्या परिस्थितीतून जातात हे मला माहिती आहे.’

Among them : History composed by poetry; One hundred percent marks in JEE Main Exam 2021; Became the first female student

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*