वृत्तसंस्था
कोलकता : केंद्र सरकारच्या योजना अमलात आणण्यास मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आडकाठी आणत आहेत. त्या सामान्यांच्या कल्याणासाठी नाही तर भाच्याच्या भल्यासाठी काम करीत आहेत. चक्रीवादळाचा फटका बसलेल्यांसाठी मोदी यांनी दहा हजार कोटी रुपयांचा निधी पाठविला होता तो भाचे अँड कंपनीने हडप केला,’’ असा घणाघात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला. Amit Shah lashes on TMC
भाच्याला मुख्यमंत्रिपदी बसविण्याच्या तयारीत ममतादीदी आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. गोसाबातील प्रचार सभेतून शहा यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप केले.
‘अम्फान चक्रीवादळातील नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्राने दहा हजार कोटी रुपये पाठविले होते. त्यातील एक रूपया तरी तुम्हाला मिळाला का?, सर्व पैसा गेला कुठे. भाचे आणि कंपनीने हा पैसा तुमच्यापर्यंत पोचू न देता खाल्ला. याचा चौकशी आम्ही करणार आहोत.