अखंड भारतातील सर्वांचा DNA 40,000 वर्षांपासून समान, हे विज्ञानातून सिद्ध; सरसंघचालक डॉ. मोहन भागवतांची ग्वाही


वृत्तसंस्था

अंबिकापूर : लव्ह जिहाद, सक्तीचे धर्मांतर, धर्मांतरामुळे राष्ट्रीय सुरक्षेला उत्पन्न झालेला धोका तसेच समान नागरी कायदा या मुद्द्यांवर संपूर्ण भारतभर वैचारिक आणि सामाजिक मंथन सुरू असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी एक अत्यंत महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. The DNA of all indians of undivided india is the same from 40000 years, says Dr. Mohan Bhagwat

अखंड भारतातील सर्व व्यक्तींचा गेल्या 40 हजार वर्षांपूर्वीपासून DNA एकसमान आहे आणि हे विज्ञानाच्या कसोटीवर सिद्ध झाले आहे, असे वक्तव्य डॉ. मोहन भागवत यांनी केले आहे. छत्तीसगडमधील अंबिकापूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका कार्यक्रमात बोलताना डॉ. मोहन भागवत यांनी देशातल्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर सटीक भाष्य केले. डॉ. भागवत म्हणाले, की आज आपल्याला आपण कितीही विभक्त असल्याचे मानत असलो, तरी विज्ञानाच्या कसोटीवर आपण एकच आहोत हे सिद्ध झाले आहे.

काबूलच्या पश्चिमेपासून ते छिंदविन नदीच्या पूर्वेपर्यंत आणि सध्या चीनच्या ताब्यात असलेल्या तिबेट पासून ते दक्षिणेत श्रीलंकेपर्यंत जो मानव समूह सध्या विद्यमान आहे, त्या मानव समूहाचा DNA किमान गेल्या 40,000 वर्षांपासून समान आहे. हे विज्ञानाने सिद्ध केले आहे. मग भले गेल्या 40,000 वर्षांमध्ये परिस्थिती भिन्नभिन्न बनल्यामुळे आपण वेगवेगळ्या भूमीमध्ये जाऊन राहत असू, आपली पूजा पद्धती, खानपान पद्धती भौगोलिक परिस्थितीनुसार वेगळी झाली असेल, आपल्यात त्या अर्थाने विभिन्नत्व आले असेल, तरी देखील विज्ञानाने हे सिद्ध केले आहे की आपला डीएनए हा समान आहे. विज्ञानाच्या कसोटीवर हे सिद्ध झाल्यामुळे आपण कितीही नाकारले तरी आपल्यातले एकत्व हे मिटणारे नाही. आपल्या सगळ्यांचे पूर्वज हे समानच आहेत.

देशातील काही घटक समाजामध्ये धार्मिक आधारावर विभिन्नत्वाची भावना रुजवत असताना सरसंघचालकांनी वर उल्लेख केलेले वक्तव्य करणे याला विशेष महत्त्व आहे. संपूर्ण भारतभर आज समान नागरी कायदा, लव्ह जिहाद, सक्तीचे धर्मांतर आणि त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेला उत्पन्न होणारा धोका या मुद्द्यावर मंथन सुरू आहे. सुप्रीम कोर्टाने देखील सक्तीच्या धर्मांतराच्या मुद्द्याची दखल घेऊन केंद्र सरकारकडे यावर कठोर उपाय योजना काय करणार?, अशी विचारणा केली आहे. या पार्श्वभूमीवर सरसंघचालकांनी देशातील जनतेच्या ऐक्यावर विज्ञाननिष्ठ भाष्य करणे हे विशेष महत्त्वाचे ठरले आहे.

The DNA of all indians of undivided india is the same from 40000 years, says Dr. Mohan Bhagwat

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात