पंजाबमध्ये विधानसभेच्या विशेष अधिवेशनात अकाली दल काँग्रेसला करणार “फाऊल”


वृत्तसंस्था

चंडीगड : पंजाब मध्ये काँग्रेसच्या चरणजीत चिंचणी सरकारने केंद्र सरकार विरोधात ठराव पास करण्यासाठी आठ नोव्हेंबरला विशेष विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. परंतु अकाली दलाने काँग्रेसच्या या प्रयत्नांना खोडा घालायचे ठरविले आहे. Akali Dal to “foul” Congress in special assembly session in Punjab

मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांचे सरकार या विधानसभा अधिवेशनात दोन विषय ठराव आणणार आहे. पहिला ठराव अर्थातच केंद्राने मंजूर केलेल्या कृषी कायद्यांविरोधात असेल तर दुसरा ठराव केंद्र सरकारने सीमा सुरक्षा दल अर्थात बीएसएफला दिलेल्या काही अधिकारांच्या विरोधात असेल. भारत – पाकिस्त सीमेअंतर्गत पन्नास किलोमीटर पर्यंतची फौजदारी कारवाई करण्याचे अधिकार केंद्र सरकारने बीएसएफला प्रदान केले आहेत. याविरोधात पंजाबचे काँग्रेस सरकार विधानसभेत ठराव आणणार आहे.

परंतु या प्रयत्नांना काटशह म्हणून अकाली दल काँग्रेसच्या गांधी परिवारा विरोधात आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते जगदीश टायटलर यांना अटक करण्यासंदर्भात ठराव मांडणार आहे. 1984 मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यानंतर जे शिखांचे शिरकाण झाले त्याला जगदीश टायटलर हे नेते जबाबदार आहेत. त्यांना अटक करावी आणि ज्यांच्या चिथावणीमुळे जगदीश टायटलर यांनी हिंसाचार घडविला त्या गांधी कुटुंबियांवर कारवाई करावी, अशी मागणी करणारे ठराव अकाली दल विधानसभेत मांडणार आहे, अशी माहिती अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल यांनी दिली आहे. यामुळे पंजाब मध्ये विधानसभेच्या विशेष अधिवेशनात दोन प्रमुख पक्ष अकाली दल आणि काँग्रेस हे एकमेकांसमोर उभे ठाकलेले दिसणार आहेत.

Akali Dal to “foul” Congress in special assembly session in Punjab

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात