सर्वसामान्यांच्याही आवाक्यात येणार एसी रेल्वेप्रवास

वातानुकुलीत रेल्वे प्रवास हा अत्यंत महागडा मानला जातो. त्यामुळे सर्वसामान्यांचे एसीतून प्रवास करणे हे केवळ स्वप्नच राहते. परंतु, आता एसी प्रवास सर्वसामान्यांच्याही आवाक्यात येणार आहे.AC rail travel will also be available to the general public


विशेष प्रतिनिधी 

नवी दिल्ली : वातानुकुलीत रेल्वे प्रवास हा अत्यंत महागडा मानला जातो. त्यामुळे सर्वसामान्यांचे एसीतून प्रवास करणे हे केवळ स्वप्नच राहते. परंतु, आता एसी प्रवास सर्वसामान्यांच्याही आवाक्यात येणार आहे.

रेल्वेच्या कपुरथला येथील रेल्वे कोच फॅक्ट्रीमध्ये एसी थ्री टियर इकॉनॉमी क्लासचा नवा कोच विकसित करण्यात आला आहे. या कोचची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. लवकरच हा कोच जनतेच्या सेवेमध्ये दाखल होणार आहे.एसी थ्री टियर इकॉनॉमी क्लासच्या या कोचमुळे एसी थ्री टियर आणि स्लिपर कोचच्या मधील पर्याय उपलब्ध होणार आहे. यामध्ये स्वस्त दरामध्ये प्रवाशांना आरामदायी आणि एसी ३ टियर कोचचा प्रवास करता येणार आहे. या कोचमध्ये ८३ बर्थ असणार आहेत.

रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या कोचचे यशस्वी परीक्षण कोटा आणि नागदाच्या दरम्यान करण्यात आले आहे. हा कोच रेल्वेच्या रुळांवरून १८० किमी प्रतितास वेगाने चालवण्यात आला. या कोचमध्ये बसण्यासाठी ८३ जागा असतील. दिव्यांगांसाठी दिव्यांग फ्रेंडली प्रवेश आणि एक्झिट गेट असतील या कोचमधील टॉयलेटसुद्धा दिव्यांग फ्रेंडली असेल.

मिडल बर्थचा हेड रूम पूर्वीपेक्षा वाढविण्यात आला आहे. या नव्या कोचमध्ये एसीच्यादरम्यान, सेपरेट डक्ट उपलब्ध असतील. प्रत्येक सीटवर प्रवासी याचा वापर करू शकतील. याच्या सीट मॉडलर आहेत. तसेच प्रत्येक सीटवर प्रत्येक प्रवाशाला एक रिडींग लँम्पसुद्धा मिळणार आहे.

AC rail travel will also be available to the general public

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*