अफगाणिस्तानात 80 मुलींना विषबाधा; सर्व प्राथमिक शाळेतील विद्यार्थिनी, रुग्णालयात दाखल; कट असल्याचा तालिबानचा आरोप


वृत्तसंस्था

काबूल : दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये उत्तर अफगाणिस्तानमध्ये प्राथमिक शाळेतील 80 मुलींना विषबाधा झाली. सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. येथील शिक्षणाधिकाऱ्यांनी रविवारी ही माहिती दिली. ऑगस्ट 2021 मध्ये तालिबान सत्तेवर आल्यानंतर अशा प्रकारची ही पहिलीच घटना आहे.80 girls poisoned in Afghanistan; All primary school girls, hospitalized; The Taliban alleges a conspiracy

तालिबानने याआधीच देशातील मुलींना सहाव्या वर्गाच्या पुढे शिक्षण घेण्यावर बंदी घातली आहे. ज्या शाळांमध्ये मुलींना विषबाधा झाली आहे, ती अफगाणिस्तानच्या सार-ए-पुल प्रांतातील आहेत. दोन्ही शाळा जवळच असल्याचे सांगितले जात आहे. एकामागून एक या शाळांना लक्ष्य करण्यात आले.



कट रचून मुलींना पाजले विष

सार-ए-पुलच्या शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले की ते या प्रकरणाची चौकशी करत आहेत. प्राथमिक तपासात हा कोणाचा तरी कट असल्याचे दिसते. मुलींना विषबाधा कशी झाली हे अद्याप समजू शकलेले नाही. तसेच मुलींचे वय किती आहे आणि त्या कोणत्या वर्गात शिकतात याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.

2015 मध्ये अफगाणिस्तानमध्येही अशीच घटना घडली होती. तेव्हा हेरात प्रांतात 600 शाळकरी मुलींना विषबाधा झाली. तेव्हाही त्याची जबाबदारी कोणत्याही संघटनेने घेतली नव्हती. त्यावेळी अनेक मानवाधिकार संघटनांनी या घटनेसाठी तालिबानला जबाबदार धरले होते.

जगाने मान्यता देण्याची तालिबानची इच्छा

अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारने 4 दिवसांपूर्वी जगातील सर्व देशांना मान्यता देण्यास सांगितले असताना ही घटना घडली आहे. या संदर्भात चर्चेसाठी कतारचे पंतप्रधान मोहम्मद बिन थानी 12 मे रोजी अफगाणिस्तानच्या कंदाहार येथे गेले होते. थानी यांनी कंदाहारमध्ये अफगाण तालिबानचा सर्वोच्च नेता हेबुतुल्ला अखुंदजादा यांच्याशी गुप्त बैठक घेतली. त्याची माहिती बुधवारी समोर आली.

एका वृत्तानुसार, थानी यांनी अखुंदजादाला स्पष्टपणे सांगितले की, जगाने तालिबान राजवट आणि अफगाण सरकारला मान्यता द्यावी असे वाटत असेल तर त्यांना महिलांना त्यांचे अधिकार द्यावे लागतील. या मुद्द्यावरून चर्चा रंगली होती.

80 girls poisoned in Afghanistan; All primary school girls, hospitalized; The Taliban alleges a conspiracy

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात