भारतात लवकरच सुरू होणार 5G सेवा?


विशेष प्रतिनिधी

दिल्ली : माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे की भारतात जागतिक दर्जाची टेलिकॉम व्यवस्था सुरू करावी. आता हे स्वप्न लवकरच साकार होणार असे दिसते आहे.

5G service to be launched in India soon?

2G पासून 5G पर्यंतचा प्रवास भारताने अवघ्या 10 वर्षांच्या काळात पूर्ण केला आहे. सध्या भारतामध्ये 4G सेवा उपलब्ध आहे. 5G सेवा कधी येणार असा प्रश्न सर्वांना पडला होता. ज्यावर केंद्रीय दूर संचारमंत्री अश्विन वैष्ण यांनी मोठी घोषणा केली आहे.

टाइम्स नाऊ ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगताना ते म्हणतात की, येत्या 6 महिन्यांमध्ये म्हणजेच पुढील वर्षाच्या एप्रिल मे महिन्यापर्यंत देशभरामध्ये 5G सेवा देण्यासाठीची लिलाव प्रक्रिया राबवली जाईल. या लिलाव प्रक्रियेसाठीचे नियम आणि इतर बाबी ट्राय करून निश्चित केल्या जातील. ही प्रक्रिया पुढील वर्षी मार्चपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यानंतर लगेचच 5G साठीची लिलाव प्रक्रिया राबवली जाईल. तांत्रिकदृष्ट्याही तटस्थ होण्यासाठी आम्ही आग्रह धरला आहे.


5G Revolution : देशात 5G क्रांतीमुळे 1.5 लाखाहून जास्त रोजगारांची निर्मिती, वाचा सविस्तर आयुष्य बदलून टाकणाऱ्या तंत्रज्ञानाविषयी


त्याचप्रमाणे ते म्हणतात की, येत्या दोन तीन वर्षांमध्ये टेलिकॉम विश्वामध्ये मोठे आमूलाग्र बदल घडून येण्याची शक्यता आहे. टेलिकॉम विश्वामधील नियमांमध्ये पूर्णपणे बदल होणार असून जागतिक स्तरावरील मानांकनानुसार हे बदल करण्यात येतील. टेलिकॉम क्षेत्रातील केंद्र सरकारचा दृष्टिकोन अमूलाग्ररीत्या बदलला असल्याचे यावेळी वैष्णव यांनी नमूद केले आहे.

5G service to be launched in India soon?

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात