श्रीमलंग गडावर धर्मांधांचा हैदोस; मंदिरात घुसून अल्ला हू अकबरच्या घोषणा; आरती बंद पाडली; चार दिवसांनंतरही गुन्हा नाही, पोलीस थंडच!!

विशेष प्रतिनिधी

कल्याण – श्रीमंलग गडावर पौर्णिमेच्या दिवशी श्रीमलंगांच्या मंदिरात ५० – ६० धर्मांधांनी घुसून हैदोस घातला. अल्ला हू अकबरच्या घोषणा देत तेथे सुरू असलेली आरती बंद पाडली. याची दखल पोलीसांनी घेतलेलीच नाही. चौकशी करून थातूर मातूर उत्तरे देऊन तक्रारकर्त्यांना वाटेला लावले, असे इंडिया टीव्हीच्या बातमीत म्हटले आहे. 50 – 60 fanatics disturbed aarti at shrimalang gad, ploice kept silence even after 4 days

सध्या कोरोना काळात मंदिर बंद असताना शिवसेनेच्या काही स्थानिक नेत्यांनी पोलीस परवानगी काढून मंदिरात गंधलेपन आणि अन्य धार्मिक विधी केले. तेथे आरती केली. पण आरती सुरू असतानाच ५० – ६० जणांचा जमाव तिथे आला आणि त्यांनी अल्ला हू अकबरच्या घोषणा द्यायला सुरूवात केली. मंदिरात घुसून आरती बंद पाडली. सुरूवातीला पोलीसांनी बघ्याची भूमिका घेतली पण नंतर कोरोना जमावबंदीचे उल्लंघन केले म्हणून हिंदू भाविकांवरच गुन्हे दाखल केले.मंदिरात घुसून आरती बंद पाडणाऱ्या जमावाविरोधात हिंदू मंचाच्या कार्यकर्त्यांनी हिल रोड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पोलीसांनी चौकशी करू असे उत्तर देऊन गुन्हाच दाखल केला नाही. या घटनेला चार दिवस उलटले तरी पोलीसांनी कारवाई केलेली नाही. त्यामुळे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा रमेश पाटील, पराग तेली, समीर भंडारी यांनी दिला आहे. तर शिवसेनेचे माजी नगरसेवक सचिन बासरे यांनी पुढची आरती रोखून दाखवा, असे आव्हान दिले आहे.

शिवसेनेचे मुख्यमंत्री असताना…

शिवसेनेचे मुख्यमंत्री असताना धर्मांधांची हिंमत होऊन ते श्रीमलंग गडावरील आरती बंद पाडतात, यावरून सोशल मीडियात प्रचंड संताप व्यक्त होतो आहे. ३ फेब्रुवारी १९९६ रोजी शिवसेनेचे नेते आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली हजारो शिवसैनिकांनी हाजी मंगल गडाचे नामांतर श्रीमंलग करून तेथील मच्छिंद्रनाथांच्या समाधीचे पूजन केले होते. त्यावेळी मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि उध्दव ठाकरे हे देखील पूजेत सहभागी झाले होते.

50 – 60 fanatics disturbed aarti at shrimalang gad, ploice kept silence even after 4 days

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*