5 States Pre Polls Read Here Who Will Win which state, Trinamool or BJP govt in Bengal

5 States Pre Polls : कोणत्या राज्यात कोणाची सत्ता? बंगालमध्ये पुन्हा तृणमूल की भाजप सरकार? वाचा सविस्तर

5 States Pre Polls : 5 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांची धामधूम सुरू आहे. याचदरम्यान विविध संस्थांनी आपापले ओपिनियन पोल सर्व्हे जाहीर केले आहेत. मागच्या तीन महिन्यांत अनेक संस्थांनी ओपिनियन पोल जाहीर केले आहेत. परंतु या सर्वांमध्ये सर्वात महत्त्वाचा पश्चिम बंगालचा सर्व्हे राहिला आहे. अनेक ओपिनियन पोलच्या आकडेवारीत येथे मोठी तफावत आढळली आहे. क्षणक्षणाला येथील राजकीय समीकरणे बदलताहेत हे म्हटल्यास वावगं ठरणार नाही. एबीपी सी-व्होटर, जन की बात आणि टाइम्स नाऊ यांनी नुकत्याच केलेल्या पाहणीत पाचही राज्यांत काय निकाल लागू शकतात याचे अंदाज वर्तवण्यात आले आहेत. 5 States Pre Polls Read Here Who Will Win which state, Trinamool or BJP govt in Bengal


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : 5 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांची धामधूम सुरू आहे. याचदरम्यान विविध संस्थांनी आपापले ओपिनियन पोल सर्व्हे जाहीर केले आहेत. मागच्या तीन महिन्यांत अनेक संस्थांनी ओपिनियन पोल जाहीर केले आहेत. परंतु या सर्वांमध्ये सर्वात महत्त्वाचा पश्चिम बंगालचा सर्व्हे राहिला आहे. अनेक ओपिनियन पोलच्या आकडेवारीत येथे मोठी तफावत आढळली आहे. क्षणक्षणाला येथील राजकीय समीकरणे बदलताहेत हे म्हटल्यास वावगं ठरणार नाही. एबीपी सी-व्होटर, जन की बात आणि टाइम्स नाऊ यांनी नुकत्याच केलेल्या पाहणीत पाचही राज्यांत काय निकाल लागू शकतात याचे अंदाज वर्तवण्यात आले आहेत.

पश्चिम बंगाल

सी व्होटरच्या ओपिनियन पोलनुसार, पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा ममता बनर्जींच्या नेतृत्वात तिसऱ्यांदा सरकार बनू शकते. तथापि, गत निवडणुकीपेक्षा त्यांचे अनेक जागांवर नुकसान होणार आहे. दुसरीकडे, भाजपला सत्ता काबीज करण्यापासून अजून वाट पाहावी लागू शकते. परंतु भाजप जागांमध्ये प्रचंड वाढ झालेली नक्कीच दिसू शकते.
दुसरीकडे, जन की बातच्या ओपिनियन पोलमध्ये मात्र अगदी उलट अंदाज वर्तवण्यात आला आहे. या पोलनुसार येथे भाजपचे सरकार बनताना दिसत आहे. भाजपला बहुमताचा आकडा सहजरीत्या गाठता येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दुसरीकडे, ममतांचा पक्ष दुसऱ्या क्रमांकावर ढकलला गेला आहे.

जन की बात Pre Poll
पश्चिम बंगाल- 294 जागा
तृणमूल – 134 ते 118 जागा
भाजप – 150 ते 162 जागा
काँग्रेस+लेफ्ट – 10 ते 14 जागा

ABP C-Voter Pre Poll
पश्चिम बंगाल- 294 जागा
तृणमूल – 152 ते 168 जागा
भाजप – 104 ते 120 जागा
काँग्रेस+लेफ्ट – 18 ते 26 जागा
इतर – 0 ते 2 जागा

TV9 Pre Poll
पश्चिम बंगाल- 294 जागा
तृणमूल – 146 जागा
भाजप – 122 जागा
काँग्रेस+लेफ्ट – 23 जागा


आसाम

सी व्होटरच्या ओपिनियन पोलमध्ये आसाममध्ये पुन्हादा भाजप सरकार बनताना दिसत आहे. राज्यात सरकार बनवण्यासाठी 63 हा जादुई आकडा आहे. भाजपच्या नेतृत्वातील एनडीएला 65 ते 73 जागा मिळू शकतात. तर काँग्रेसच्या नेतृत्वातील यूपीएला 52 ते 60 जागा मिळण्याचा अंदाज आहे. याशिवाय जन की बातच्या ओपिनियन पोलमध्येही भाजपच्या नेतृत्वातील एनडीएकडे सत्ता जाणार असल्याचे स्पष्ट संकेत देण्यात आले आहेत.

जन की बात Pre Poll
आसाम – एकूण 126 जागा
एनडीए- 68 ते 78 जागा
यूपीए – 48 ते 58 जागा
इतर – 0 जागा

ABP C-Voter Pre Poll
आसाम – एकूण 126 जागा
एनडीए – 65 ते 73 जागा
यूपीए – 52 ते 60 जागा
इतर – 0 ते 4 जागा

TV9 Pre Poll
आसाम – एकूण 126 जागा
एनडीए – 73 जागा
यूपीए – 50 जागा
इतर – 0 ते 3 जागा


तामिळनाडू

तामिळनाडू विधानसभेच्या 234 जागांसाठी निवडणूक होत आहे. सी व्होटरच्या पोलमध्ये यात यूपीएला 173 ते 181 जागांवर विजय मिळण्याचा अंदाज आहे. तर एनडीएला या निवडणुकीत 45 ते 53 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

ABP C-Voter Pre Poll
तमिलनाडु – एकूण 234
यूपीए (डीएमके+काँग्रे+अन्य)- 173 ते 181
एनडीए (एआयएडीएमके+भाजप+अन्य) – 45 ते 53
एमएनएम- 1 ते 5
एएमएमके- 1 ते 5
इतर – 0 ते 4


केरळ

सी व्होटरच्या प्री पोलनुसार येथे पुन्हा एकदा एलडीएफचे सरकार बनताना दिसत आहे. एलडीएफला 71 ते 83 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अशा प्रकारे राज्यात पुन्हा एकदा एलडीएफचे सरकार बनू शकते. यूडीएफच्या खात्यात 56 ते 68 जागा जाऊ शकतात. येथे भाजपला 0 ते 2 मिळण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.

ABP C-Voter Pre Poll
केरळ – 140
एलडीएफ – 71 ते 83 जागा
यूडीएफ – 56 ते 68 जागा
भाजप – 0 ते 2 जागा
इतर – 0 जागा


पुडुचेरी

एबीपी- सी व्होटर प्री पोलनुसार पुडुचेरीमध्ये एनडीएला 30 पैकी 19 ते 23 जागा मिळू शकतात. तर यूपीए, ज्यात काँग्रेस आणि डीएमके आहेत, त्यांना 7 ते 9 जागा मिळण्याची अंदाज आहे. पुडुचेरीत मतदान 6 एप्रिलला होणार आहे.

ABP C-Voter Pre Poll
पुडुचेरी – एकूण 30 जागा
एनडीए – 19 ते 23 जागा
यूपीए – 7 ते 9 जागा

5 States Pre Polls Read Here Who Will Win which state, Trinamool or BJP govt in Bengal

महत्त्वाच्या बातम्या

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*