आत्मनिर्भर भारताचा इफेक्ट : भारतात 2 वर्षांत 4 स्वदेशी लसी विकसित!!


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : आत्मनिर्भर भारत अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली भारतात आरोग्य क्षेत्रातही स्वदेशी कंपन्यांना प्रोत्साहन दिल्यामुळे या कंपन्यांनी अवघ्या 2 वर्षांत 4 स्वदेशी लसी विकसित केल्या आहेत, अशी माहिती केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी दिली. विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयातील जैवतंत्रज्ञान विभागाने (DBT) “मिशन कोविड सुरक्षा” च्या माध्यमातून, चार लसी वितरित केल्या आहेत, कोवॅक्सिनच्या उत्पादनात वाढ केली आहे तसेच भविष्यातील लसींच्या सुरळीत विकासासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण केल्या आहेत, यामुळे आपला देश महामारीचा सामना करण्यासाठी सज्ज आहे, असे ते म्हणाले. या लसी विविध संस्थांच्या सहकार्याने विकसित करण्यात आल्या आहेत. 4 indigenous vaccines developed in India in 2 years

या आहेत ४ लसी :

ZyCoV-D : जगातील पहिली आणि भारताची स्वदेशात विकसित डीएनए लस.

CORBEVAXTM : भारताची पहिली प्रोटीन सबयुनिट लस.

GEMCOVAC™-19 : जगातील पहिली आणि भारताची स्वदेशात विकसित.

mRNA लस आणि iNCOVACC : जगातील पहिली आणि भारताची स्वदेशात विकसित नाकावाटे घेण्याची कोविड-19 प्रतिबंधक लस.

भारत सरकारने आत्मनिर्भर भारत 3.0 पॅकेज अंतर्गत सुमारे 900 कोटी रुपयांचा निधी “मिशन कोविड सुरक्षा” साठी घोषित केल्याचे डॉ. जितेंद्र सिंह यांनी अधोरेखित केले. सुरक्षित, परिणामकारक, परवडणाऱ्या आणि स्वदेशी कोविड-19 लसींचा वेगवान रीतीने विकास करणे हा यामागचा उद्देश होता, असे मंत्र्यांनी नमूद केले.

4 indigenous vaccines developed in India in 2 years

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात