एनडीएमध्ये पुढील वर्षी दाखल होणार २० मुली, सैन्यात जाऊन देशसेवा करणार


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: भारतीय लष्करात आता महिलाही लढणार आहेत. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये पुढील वर्षी २० मुलींना प्रवेश मिळणार आहे. आपले तीन वर्षांचे प्रशिक्षण पूर्ण करून त्या लष्करी कामगिरीसाठी सज्ज होणार आहेत.20 girls will join NDM next year, will join the army and serve the country

पुण्यात नॅशनल डिफेन्स अ‍ॅकॅडमीतून प्रशिक्षण पूर्ण केल्यावरच लष्करात सेवा करण्याची संधी मिळते. येथे प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा घेतली जाते. या पार्श्वभूमीवर नॅशनल डिफेन्स अ‍ॅकॅडमीच्या प्रवेश परीक्षेत महिला उमेदवारांचा समावेश करण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे.



त्यामुळे येत्या 14 नोव्हेंबरला होणाऱ्या एनडीएच्या प्रवेश परीक्षेला महिला उमेदवार बसू शकतात. पुढील वर्षी एनडीएच्या मार्फत सुमारे 20 महिला कॅडेट्सची सैन्यात भरती केली जाईल आणि तिन्ही सेना दलांमध्ये वेगवेगळ्या पदांवर त्या सेवा देतील.

कॅडेट्स 12 वी परीक्षेनंतर त्यांच्या प्री-कमिशन प्रशिक्षणासाठी एनडीएत प्रवेश घेतात. 20 महिला कॅडेट्सपैकी सैन्य दलात 10 महिला अधिकाºयांची सर्वांत मोठी तुकडी असेल. त्यानंतर भारतीय हवाई दल आणि नौदलात प्रत्येकी पाच महिला अधिकारी असतील.

ैमहिला उमेदवारांना एनडीएच्या प्रवेश परीक्षेला बसण्याची परवानगी पुढील वषार्पासून द्यावी, अशी विनंती केंद्र सरकारने केली होती; मात्र सप्टेंबरमध्ये सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारची ही विनंती फेटाळली होती.

केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं होतं की महिला उमेदवारांना एनडीए प्रवेश परीक्षेला बसण्याची परवानगी देणारी अधिसूचना पुढील वर्षी मे महिन्यापर्यंत जारी केली जाईल. परंतु त्यावर, ‘महिलांना त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवता येणार नाही. एनडीएैत प्रवेश घेण्यासाठी महिला एक वर्ष वाट पाहू शकत नाहीत,’ असं न्यायालयानं म्हटलं होतं.

20 girls will join NDM next year, will join the army and serve the country

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात