16 DECEMBER : ऐतिहासिक दिवस ! राजनाथ सिंह म्हणतात This day that year ! स्वर्णिम विजय पर्व-राष्ट्रपती ढाक्यात-पंतप्रधान वॉर मेमोरीयलवर


1971 चे युद्ध: पाकिस्तानवर विजय मिळवून बांगलादेश अस्तित्वात आला. 1971 मध्ये, पाकिस्तानसोबत युद्धाच्या 13 व्या दिवशी संध्याकाळी 4:21 वाजता युद्धविरामावर स्वाक्षरी करण्यात आली. 16 DECEMBER: Historic day! Rajnath Singh says this day that year! Golden Victory Festival – President in Dhaka – Prime Minister at War Memorial

  • भारतातही बांगलादेश निर्मितीनिमित्त काही कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आल आहे.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सकाळी 10.30 वा. नॅशनल वॉर मेमोरियलवर पोहोचून कार्यक्रमात सहभागी होतील.
  • बांगलादेशची राजधानी ढाक्यात राष्ट्रपती कोविंद हे विविध सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी झाले.
  • संरक्षण मंत्री राजनाथसिंग यांनीही 1971 च्या वीरांची आठवण काढत, त्यावेळेसच्या युद्धाचे काही फोटोज शेअर केले.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : 1971 मध्ये, या दिवशी (16 डिसेंबर), भारताने अधिकृतपणे पाकिस्तानवर विजय घोषित केला. म्हणूनच दरवर्षी 16 डिसेंबरला विजय दिवस साजरा केला जातो. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गोल्डन विजय दिवसानिमित्त अनेक ट्विट केले आहेत. त्यांनी शूर सैनिकांच्या पराक्रमाचे स्मरण करून 1971 च्या युद्धाला भारतीय लष्कराच्या इतिहासातील सुवर्ण अध्याय असल्याचे सांगितले.

आजचा दिवस ऐतिहासिक- कारण आजच्याच दिवशी 50 वर्षापूर्वी भारताना पाकिस्तानला युद्धात पराजीत केलं होतं. त्याच युद्धातून बांगलादेशची निर्मिती झाली. बांगलादेश युद्ध हे भारतीय सैनिकांचं साहस, शौर्य आणि नैतिकेचं प्रतिक मानलं जातं. पूर्व पाकिस्तान मुक्त झाला होता. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींसह लष्करप्रमुख जनरल माणेकशाॅ यांच्याही धडाडीच्या निर्णयाच्या सुरस कथा अजूनही सांगितल्या जातात.

  • हा दिवस भारत-बांगलादेशमध्ये विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. भारतीय सैनिकांच्या वीरतेला सलाम करण्याचा हा दिवस आहे.
  • ह्या एका घटनेवरच भारत आणि बांगलादेश यांच्यातले संबंध अतूट ठरलेले आहेत.

13 दिवस चाललं युद्ध

भारताची फाळणी झाली. त्यात पाकिस्तान वेगळा देश निर्माण झाला. मुस्लिमबहुल भाग हा पाकिस्तान म्हणून उदयाला आला. त्यातही पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान असे दोन भाग होते. पश्चिम पाकिस्तान म्हणजे आताचा भाग, त्यांनी पूर्व पाकिस्तानवर पहिल्यापासूनच दुजाभाव केला. परिणामी पूर्व पाकिस्तानमध्ये पश्चिम पाकिस्तानबद्दल खदखद निर्माण झाली. शेवटी 1971 मध्ये पूर्व पाकिस्तानातल्या जनतेनं उठाव केला. शेख मुजीबूर रहमान यांच्या नेतृत्वाखाली तो यशस्वी केला. भारतानं पूर्व पाकिस्तानच्या बाजूनं वजन टाकलं.

3 डिसेंबर 1971 रोजी युद्धाला सुरुवात झाली. हे युद्धा 13 दिवसांपर्यंत चाललं.

यात भारताच्या आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्सनं पाकिस्तानला चारीमुंड्याचीत केलं. तत्कालीन भारतीय लष्कर प्रमुख सॅम माणेकशाॅ यांच्या नेतृत्वाखाली भारतानं निर्णायकी कामगिरी पार पाडली. ढाक्यात 93 हजार पाकिस्तानी सैनिकांनी भारतीय लष्करासमोर सरेंडर केलं. पाकिस्तानचे दोन तुकडे झाले. बांगलादेश नावाचा नवा देश उदयाला आला.

पंतप्रधान, राष्ट्रपतींकडून सन्मान

बांगलादेशच्या निर्मितीचं हे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. त्यासाठी बांगलादेशमध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलंय.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे ह्या कार्यक्रमात भाग घेण्यासाठी बांगलादेशच्या तीन दिवसाच्या दौऱ्यावर आहेत. दौऱ्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच काल त्यांनी बांगलादेशचे राष्ट्रपती अब्दूल हमिद यांची भेट घेतली. कोविंद यांच्या सन्मानार्थ बांगलादेशच्या राष्ट्रपतींनी भोजनाचं आयोजन केलं होतं. तसच बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांच्याशीही राष्ट्रपती कोविंद यांनी द्विपक्षीय मुद्यावर चर्चा केली. बांगलादेशच्या स्वातंत्र्याबद्दल कोविंद यांनी शुभेच्छा दिल्या.

राजनाथ सिंह म्हणाले, ‘सुवर्ण विजय दिवसानिमित्त, 1971 च्या युद्धात आपल्या सशस्त्र दलांचे शौर्य आणि त्यागाचे स्मरण करतो. 1971 चे युद्ध भारताच्या लष्करी इतिहासातील एक सुवर्ण अध्याय आहे. आम्हाला आमच्या सशस्त्र दलांचा आणि त्यांच्या कामगिरीचा अभिमान आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले, ‘भारतीय जवानांच्या अद्भूत शौर्य आणि शौर्याचे प्रतीक असलेल्या विजय दिवसाच्या सुवर्ण महोत्सवी वीर जवानांना मी नमन करतो.  1971 मध्ये या दिवशी भारतीय लष्कराने शत्रूंचा पराभव करून मानवी मूल्ये जपण्याच्या परंपरेच्या इतिहासात सुवर्ण अध्याय जोडला होता. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल KOO वर म्हणाले , ‘1971 च्या युद्धात पाकिस्तानवर भारताच्या ऐतिहासिक विजयाच्या स्मरणार्थ विजय दिवसाच्या 50 व्या वर्धापन दिनानिमित्त सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा. भारतीय सैन्याच्या अतुलनीय शौर्याला आणि शौर्याला सलाम करताना, मला त्या शूर सुपुत्रांचे स्मरण आहे ज्यांनी आपले सर्वस्व देऊन देशाचा गौरव केला.

सुवर्ण विजय उत्सवानिमित्त पंतप्रधानांच्या राष्ट्रीय समर स्मारकावर आज शहीद झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली वाहतील. यावेळी चारही दिशांनी पाठवलेल्या मशाल पंतप्रधानांच्या उपस्थितीत राष्ट्रीय युद्ध स्मारकापर्यंत पोहोचतील. 71 च्या युद्धातील दिग्गजही यावेळी उपस्थित राहणार आहेत.

16 DECEMBER: Historic day! Rajnath Singh says this day that year! Golden Victory Festival – President in Dhaka – Prime Minister at War Memorial

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात