ऑगस्टमध्ये १५.१५ लाख भारतीयांनी गमावल्या आपल्या नोकऱ्या


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली – ऑगस्टमध्ये देशाचा बेरोजगारी दर ८.३२ टक्क्यांपर्यंत वाढल्याची चिंताजनक आकडेवारी समोर आली आहे. सीएमआयईच्या आकडेवारीनूसार, आॅगस्टमध्ये तब्बल १५.१५ लाख भारतीयांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या आहेत. 15 lack peoples lost job in Aug

आकडेवारीनुसार, जुलैमध्ये देशाचा बेरोजगारी दर ६.९५ टक्के होता; मात्र ऑगस्टमध्ये त्यात १.३७ टक्क्यांनी वाढ होऊ हा दर आता ८.३२ टक्क्यांपर्यंत गेला आहे.



शहरी बेराजगारीचे प्रमाण हे ग्रामीण भागापेक्षा अधिक आहे. जुलैमध्ये देशाचा शहरी बेरोजगारीचा दर ८.३ टक्के होता; आॅगस्टमध्ये हा दर तब्बल ९.७८ टक्क्यांवर गेला आहे; तर ग्रामीण बेरोजगारीचा दर जुलैमध्ये ६.३४ टक्के होता.

त्यातही १.३ टक्क्याने वाढ होऊन हा दर आता ७.६४ टक्क्यांपर्यंत गेला आहे. या आकडेवारीनुसार, देशातील शहरांमध्ये जुलैमध्ये औपचारिक व अनौपचारिक क्षेत्रात जवळपास ३९.९३ कोटी लोकांना नोकऱ्या होत्या. आॅगस्टमध्ये ही संख्या ३९.७७ कोटीपर्यंत आली; तर ग्रामीण भागात जवळपास १३ लाख नोकऱ्या कमी झाल्या.

15 lack peoples lost job in Aug

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात