भारतीय हवाई दलात दाखल होणार आणखी १२ राफेल विमाने

भारतीय हवाईदलाची ताकद वाढविण्यासाठी आणखी १२ राफेल विमाने दाखल होणार आहेत. त्यामुळे हवाईदलाची मारक क्षमता वाढणार आहे.12 more Rafale aircraft to enter Indian Air Force


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भारतीय हवाईदलाची ताकद वाढविण्यासाठी आणखी १२ राफेल विमाने दाखल होणार आहेत. त्यामुळे हवाईदलाची मारक क्षमता वाढणार आहे.

फ्रान्सची कंपनी दसॉल्ट एव्हीएशन आणखी तीन विमान पुढील चार दिवसांता भारताकडे सुपूर्द करणार आहे. ही विमाने अंबालाच्या हवाई दलावर उतरणार आहेत. याचबरोबर एप्रिलमध्ये आणखी नऊ विमाने भारतात दाखल होणार आहेत. भारतीय हवाई दलाच्या लढाऊ पायलट प्रशिक्षणासाठी फ्रान्समध्ये सात राफेल लढावू विमाने सध्या वापरली जात आहेत.


हवाईयुद्धात अमेरिका तर सागरी युद्धात चीन ठरेल सरस, भारताच्या लष्कराची चौथ्या स्थानी झेप

पहिले राफेल विमान 29 जुलैला भारतात दाखल झाले होते. फ्रान्सने 59 हजार कोटी रुपयांना भारताला 36 लढाऊ विमाने देण्याबाबत 2015 मध्ये करार केला होता. गेल्या वर्षी 10 सप्टेंबरला पहिले राफेल अंबालामध्ये हवाई दलात दाखल झाले होते.भारतीय हवाईदलाने एप्रिलच्या मध्यावर राफेल लढाऊ विमानांच्या दुसºया स्क्वाड्रनच्या तैनातीची तयारी केली आहे. ही स्क्वाड्रन पश्चिम बंगालच्या हाशिमारा हवाई तळावर तैनात केली जाणार आहे.

राफेलची पहिली स्क्वाड्रन हिमाचलच्या अंबाला हवाई तळावर तैनात आहे. तीन राफेल लढाऊ विमाने भारतात आणण्यासाठी भारतीय हवाई दलाची टीम फ्रान्समध्ये गेली आहे. ही विमाने 30 किंवा 31 मार्चला भारतात येतील असे फ्रान्स आणि भारतीय राजदूतांनी सांगितले.
फ्रान्सच्या बोरदू शहरातील मेरिगनेक हवाई तळावरून ७००० किलोमीटरचे अंतर पार करून ही विमाने भारतीय हवाई हद्दीत येतील.

मध्येच हवेतच इंधन भरणे आणि अरब अमिरातमध्ये विश्रांतीसाठी ही विमाने काही काळ थांबतील. पहिल्यावेळेला पाच विमाने भारतात येत असतानाच ३०,००० फूट उंचीवर त्यांनी इंधने भरली आहेत. कोरोना संकटामुळे कराव्या लागलेल्या लॉकडाऊनची अडचण येऊनही कंपनीने त्यापैकी पहिल्या तुकडीतील विमाने ठरल्यावेळी सुपूर्द केली आहेत.

12 more Rafale aircraft to enter Indian Air Force

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*