जयललिता यांच्या निकटवर्तीय शशिकला यांची शंभर कोटी रुपयांची मालमत्ता जप्त, भ्रष्टाचारप्रकरणी आयकर विभागाची कारवाई


विशेष प्रतिनिधी

चेन्नई: तामीळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या निकटवर्तीय व्ही. के. शशिकला यांच्या मालकीच्या अकरा मालमत्ता आयकर विभागाने जप्त केल्या आहेत. तमिळनाडूच्या पायनूर गावात 24 एकरात पसरलेली ही मालमत्ता शशिकला यांनी 1991 ते 1996 दरम्यान विकत घेतल्या होत्या. त्यावेळी जयललिता या मुख्यमंत्री होत्या.Jayalalithaa’s close confidante Shashikala’s property worth Rs 100 crore confiscated, Income tax department takes action in corruption case

कर्नाटकच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश जॉन मायकेल कुन्हा यांनी 2014 साली दिलेल्या एका निकालपत्रात या 11 मालमत्तांना जयललिता, शशिकला आणि त्यांचे दोन नातेवाईक यांच्या बेहिशोबी मालमत्ता ठरविले होते. नव्वदच्या दशकात या मालमत्ता खरेदी केल्या त्यावेळी त्यांची किंमत २० लाख रुपये दाखविण्यात आली होती. मात्र, आता त्यांची किंमत शंभर कोटींपेक्षा जास्त आहे.



2014 च्या न्यायालयाच्या निकालाच्या आधारावर,आयकर विभागाने बेनामी व्यवहार प्रतिबंध कायद्याअंतर्गत या मालमत्ता जप्त केल्या आहेत. राज्याच्या भूमि नोंदणी विभागाने या मालमत्तांच्या बाहेर नोटीस लगावल्या आहेत. मालमत्ता जोडल्या आहेत, असे सूत्रांनी सांगितले. शशिकला या मालमत्तेचा वापर करू शकतील परंतु त्यांच्या विक्रीचा कोणताही व्यवहार करू शकणार नाहीत, असेही सांगण्यात आले आहे.

शशिकला यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात चार वर्षे तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. तुरुंगातून सुटल्यावर त्या चेन्नईला परत गेल्या होत्या. मात्र, अण्णा द्रुमुकमधून त्यांची हकालपट्टी करण्यात आली.

Jayalalithaa’s close confidante Shashikala’s property worth Rs 100 crore confiscated, Income tax department takes action in corruption case

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात