Yes Bank Scam SEBI Order to seize Yes Bank CEO Rana Kapoors bank accounts, shares, mutual funds

Yes Bank Scam : येस बँकेचे माजी सीईओ राणा कपूर यांना सेबीचा दणका; बँक खाती, शेअर्स, फंड जप्तीचा आदेश

Yes Bank Scam : येस बँकेचे माजी एमडी आणि सीईओ राणा कपूर यांना मोठा धक्का बसला आहे. सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाने (SEBI) राणा कपूरकडून 1 कोटी रुपयांहून अधिक दंड वसूल करण्यासाठी त्यांची सर्व बँक खाती, समभाग, म्युच्युअल फंड आणि लॉकर जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. कपूर यांना नियामकांनी दंड ठोठावला होता, परंतु ते परतफेड करण्यात अयशस्वी ठरले. सेबीने सप्टेंबर 2020 मध्ये राणा कपूरवर 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. Yes Bank Scam SEBI Order to seize Yes Bank CEO Rana Kapoors bank accounts, shares, mutual funds


विशेष प्रतिनिधी

मुंबई : येस बँकेचे माजी एमडी आणि सीईओ राणा कपूर यांना मोठा धक्का बसला आहे. सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाने (SEBI) राणा कपूरकडून 1 कोटी रुपयांहून अधिक दंड वसूल करण्यासाठी त्यांची सर्व बँक खाती, समभाग, म्युच्युअल फंड आणि लॉकर जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. कपूर यांना नियामकांनी दंड ठोठावला होता, परंतु ते परतफेड करण्यात अयशस्वी ठरले. सेबीने सप्टेंबर 2020 मध्ये राणा कपूरवर 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता.

सेबीने म्हटले की, हे मानण्यासाठी पुरेसे कारण आहे की, डिफॉल्टर (कपूर) आपल्या बँकेत असलेल्या खात्यांतील रक्कम / उत्पन्नाचा निपटारा करू शकतो आणि प्रमाणपत्रांतर्गत रकमेच्या वसुली प्रक्रियेत उशीर होईल किंवा अडथळा होऊ शकतो. सेबीने एका रिकव्हरी कार्यवाहीच्या आदेशात म्हटले की, 25 सप्टेंबर 2020 रोजी ठोठावलेला दंड भरण्यास कपूर अपयशी ठरल्यानंतर ही जप्तीची कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सेबीने कपूर यांच्यावर मॉर्गन क्रेडिटच्या व्यवहाराबाबत कोणताही खुलासा न केल्याने एक कोटीचा दंड ठोठावला होता. ही येस बँकेची गैर-प्रवर्तक संस्था होती.

काय आहे प्रकरण?

येस बँकेची गैर-प्रवर्तक संस्था असलेल्या मॉर्गन क्रेडिटचा व्यवहार उघड न केल्याबद्दल नियामकांनी कपूरवर एक कोटी रुपयांचा दंड ठोठावला. सेबीने म्हटले की, येस बँकेच्या बोर्डाला या व्यवहाराची माहिती देऊन ते आणि भागधारक यांच्यात एक अपारदर्शकता होती. सेबीच्या मते, हे लिस्टिंगच्या नियमांचे उल्लंघन आहे. सेबीने आपल्या रिकव्हरी ऑर्डरमध्ये बँक, डिपॉझिटरीज आणि म्युच्युअल फंडांना कपूरच्या खात्यातून कोणतेही डेबिट येऊ देऊ नये, असे सांगितले आहे. तथापि, क्रेडिटला परवानगी देण्यात आली आहे. नियामकांनी बँका, ठेवी आणि म्युच्युअल फंडमधील कपूरच्या सर्व खात्यांचा तपशील देण्यास सांगितले आहे, यात मागील एका वर्षाच्या खात्याच्या स्टेटमेंटची प्रतही सामील आहे.

Yes Bank Scam SEBI Order to seize Yes Bank CEO Rana Kapoors bank accounts, shares, mutual funds

महत्त्वाच्या बातम्या

नानाच्या ताना !

Corona Crisis In Maharashtra : एका दिवसात 32 हजार रुग्ण, बीड-परभणी-नांदेडमध्ये कडक लॉकडाऊन

चिंता मिटली! लसीकरणात भारताचे Nation First धोरण, देशाची गरज भागल्यावरच निर्यातीचा विचार

धक्कादायक : औरंगाबादेत इन्शुरन्ससाठी नागरिक कोरोनाग्रस्त होत असल्याचा पालिका आयुक्तांचा खळबळजनक दावा

अनिल परब यांच्याकडून पदाचा गैरवापर, गृह विभागाच्या कारभारात ढवळाढवळ, मनसेची राज्यपालांकडे तक्रार

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*