अनिल देशमुखांची विकेट काढली, तर सरकारचा अख्खा डावच अर्ध्यावर कोसळण्याची ठाकरे – पवारांना भीती!!

विशेष प्रतिनिधी

मुंबई – सचिन वाझे – अनिल देशमुख खंडणीखोरी प्रकरणात विरोधी भाजप अत्यंत आक्रमक झाल्यावर गृहमंत्री अनिल देशमुखांचा राजीनामा घेऊन त्यांची राजकीय विकेट काढली, तर सरकारचा अख्खा डावच कोसळण्याची भीती ठाकरे – पवारांना वाटत असल्याने अनिल देशमुखांना लडखडत – अडखळत निसरड्या विकेटवर खेळविण्याचा डाव ठाकरे – पवार खेळत असल्याचे दिसते आहे. why sharad pawar and uddhav thackeray are shielding anil deshmukh?

सरकारच्या डाव्याच्या सुरूवातीपासूनच विरोधकांचा सीम बॉलर देवेंद्र फडणवीस यांच्या सीमर्सपुढे ठाकरे – पवार सरकारचे एक – एक खेळाडू जायबंदी झाले आहेत. अख्खे विधिमंडळाचे १० दिवसांचे अधिवेशन देवेंद्र फडणवीसांनी राजकीयदृष्ट्या खाऊन टाकले. त्यांच्या प्रत्येक सीम बॉलने महाविकास आघाडीतले तगडे खेळाडू जायबंदी झाले.विवाहबाह्य संबंधांच्या मुद्द्यावरून धनंजय मुंडेंची विकेट पडता पडता राहिली, पण  संजय राठोड यांचा तर राजीनामा घेऊन विरोधकांनी शिवसेनेची विकेट काढलीच.  आणि आता जर गृहमंत्री अनिल देशमुखांची विकेट विरोधकांना काढू दिली, तर ठाकरे – पवार सरकारचा अख्खा डावच अर्ध्यावर कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे. कारण अनिल देशमुख हे निसरड्या विकेटवर हिटविकेट झाले आहेत…पण ते डाव सोडून जायला तयार नाहीत.

आणि डाव सोडून जायला ठाकरे – पवारांनी त्यांना भाग पाडलेच, तर ते पॅव्हेलियनमध्ये बसून असा “डाव खेळतील”, की ठाकरे – पवार सरकारचे पुढचे खेळाडूच काय पण दस्तुरखुद्द ठाकरे – पवार हे कॅप्टन्सच पुरते आऊट होतील आणि सरकारचा अख्खा डाव दीड वर्ष उलटायच्या आत संपुष्टात येईल. ही ठाकरे – पवारांना भीती वाटते आहे.

त्यातूनच हिटविकेट जाऊनही अनिल देशमुखांना खेळपट्टीवर टिकवून धरण्यासाठी ठाकरे – पवारांची काल आणि आज मशक्कत चालू दिसते आहे.

why sharad pawar and uddhav thackeray are shielding anil deshmukh?

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*