राज्यसभा निवडणूक : शिवसेनेला खरा मित्र उरलाय तरी कोण??; अपक्ष आमदारांशी पंगा वाढला!!


नाशिक : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संभाजीनगर मधील सभेत आपण ज्यांच्या विरोधात लढत होतो, त्यांनी आपल्याला मान सन्मान देऊन राज्याचा विकास करण्यासाठी मदत केली, असा दावा केला होता. पण राज्यसभेच्या निवडणुकीत ज्या मित्रांनी सहाव्या जागेवर शिवसेनेला उमेदवार उभा करण्यास सांगून पूर्ण मदत करण्याची तयारी दर्शवली, त्यालाच दगा केला. अपक्ष आमदारांशी शिवसेनेचा पंगा वाढला. या एका निवडणुकीमुळे शिवसेनेला मित्र उरलाय तरी कोण?, हा प्रश्न तयार झाला आहे. Who is Shiv Sena’s true friend? Conflict with independent MLAs increased

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या उमेदवारांचा कोटा आयत्यावेळी वाढवून, शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव केला अशी चर्चा आहे. त्यामुळे शिवसेनेने या नवीन मित्रांवर तरी विश्वास ठेवावा की नाही?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.


Sanjay Raut – Pawar : शिवसैनिकांच्या जंगी स्वागतानंतर संजय राऊत म्हणाले, मी पवारांचा माणूस!!


– संजय पवारांचा पराभव

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे संजय राऊत, प्रफुल्ल पटेल आणि प्रतापगढी हे विजयी झाले, तर भाजपचे पियुष पटेल, अनिल बोंडे यांचा विजय निश्चितच होता, परंतु सहाव्या जागेसाठी शिवसेनेचे संजय पवार आणि भाजपचे धनंजय महाडिक यांच्यात खरी चुरस होती. मतांची आकडेवारी पाहता महाविकास आघाडीचे उमेदवार संजय पवार हे विजयी होतील, असा दावा सरकार करत होते. परंतु संजय राऊत यांना महाविकास आघाडीच्या अन्य दोन उमेदवारांच्या तुलनेत कमी मते पडली. राऊत हे विजयी झाले असले तरी संजय पवार यांचा दारुण पराभव झाला.

– अचानक कोटा वाढवला

शिवसेनेच्या या चौथ्या उमेदवाराच्या विजयाची रणनीती ठरलेली असतानाच, अचानकपणे निवडणुकीच्या अवघ्या काही तास आधी शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारासाठी मतांचा कोटा वाढविल्याने शिवसेनेच्या आमदारांची रणनीती चुकल्याची चर्चा आहे. शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यात ४२ मतांचा कोटा ठरलेला असताना, शरद पवार यांनी आपल्या पक्षाचे उमेदवार प्रफुल्ल पटेल यांच्या आग्रहाखातर त्यांच्यासाठी ४४ मतांचा कोटा केला. परंतु शिवसेनेने तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतर हा कोटा कमी केला. पण प्रफुल्ल पटेलांना 43 मते मिळाली. यात “गडबड” झाली आहे.

– आघाडीतूनच घात झाला

राष्ट्रवादी काँग्रेसच्या बदललेल्या भूमिकेमुळे शिवसेनेची दुसरी जागा धोक्यात आली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केल्यानंतर मतांचा कोटा कमी करण्यात आला, तरी शिवसेनेने आखलेल्या रणनीतीमध्ये यामुळे बराच बदल झाला, याचा फटका शिवसेनेला बसल्याची चर्चा आहे. या प्रकारानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या व्होटिंग पॅटर्नवर शिवसेनेच्या पोलिंग एजंटचे बारीक लक्ष होते, तरीही त्यांचा घात झाला. त्यामुळे महाविकास आघाडीतील पक्षानेच मोठा घात केल्याची शिवसेनेची खात्री आहे.

– मित्र कोण आणि हाडवैरी कोण?

संभाजीनगर मधील सभेमध्ये बोलताना उध्दव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद सांभाळणे तेही काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत इतके दिवस, ज्यांच्या विरोधात आपण लढत होतो, त्यांनी आपल्याला मान सन्मान देऊन राज्याचा विकास करण्यासाठी मदत केली आणि आज मित्र हाडवैरी बनला आणि शत्रू मित्र बनले आहेत,असे सांगितले खरे, पण राज्यसभेच्या निवडणुकीनंतर शिवसेनेचे खरे मित्र कोण आणि हाडवैरी कोण असा सवाल खडा झाला आहे. भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांनीही प्रसार माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे विधान केले आहे. राज्यसभा निवडणुकीने त्यावर शिक्कामोर्तब केले आहे.

Who is Shiv Sena’s true friend? Conflict with independent MLAs increased

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात