मुलगी झाली, लक्ष्मी आली; लेक लाडकी योजनेचे नेमके स्वरूप काय??; वाचा सविस्तर


प्रतिनिधी

मुंबई : शिंदे – फडणवीस सरकारने मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना अर्थसंकल्पात जाहीर केली. या योजनेअंतर्गत मुलीच्या जन्मापासून ते वयाच्या १८ वर्षापर्यंत राज्य सरकार मदत करणार आहे. या योजनेचे नेमके स्वरूप काय आहे याबाबत जाणून घेऊ या…What is the Lek ladki yojana?

कोणाला मिळणार लाभ ?

पिवळ्या व केशरी रेशनकार्ड धारकांना मुलीच्या जन्मानंतर ५ हजार रुपये, इयत्ता चौथीत ४ हजार रुपये, सहावीत ६ हजार रुपये, अकरावीत ८ हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे. लाभार्थी मुलीचे वय १८ झाल्यावर तिला ७५ हजार रुपये रोख देण्यात येणार आहेत. त्यामुळे एकूण ९८ हजारांची मदत मुलींना सरकारकडून करण्यात येणार आहे. पण त्यात 2000 ची भर घालून पूर्ण 100000 रूपयांची मदत मिळवून देणार. मुंबई शहर आणि उपनगर मिळून जवळपास २३ लाख ५५ हजार कुटुंबांकडे केशरी, पिवळे रेशनकार्ड आहेत.



लेक लाडकी योजनेचा विस्तार

मुलींवर आधारित पूर्वीच्या योजनांना अल्प प्रतिसाद मिळत असल्याने लेक लाडकी ही योजना आखून या योजना विस्तार करण्यात आला आहे. लेक लाडकी योजनेनुसार पिवळ्या, केशरी रेशनकार्ड धारकांच्या मुलींना हा लाभ मिळणार आहे.

“मुलगी झाली, लक्ष्मी आली”

जन्मानंतर मुलीला ५ हजार रुपये,

पहिलीत ४ हजार रुपये

सहावीत ६ हजार रुपये

अकरावीत ८ हजार रुपये

मुलगी १८ वर्षांची झाल्यावर ७५ हजार रुपये

एकूण ९८ हजारांची मदत

पण त्यात 2000 भर घालून पूर्ण 100000 रूपयांची मदत देणार

What is the Lek ladki yojana?

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात