सचिन वाझेंनी असा कोणता खुलासा केला की शरद पवार यांच्या पोटात दुखायला लागले,नवीन जिंदल यांचा सवाल

सचिन वाझेंनी एनआयएसमोर असा कोणता खुलासा केला की, शरद पवार यांच्या अचानक पोटात दुखायला लागले आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागले, असा सवाल दिल्लीतील भाजपचे मीडिया प्रमुख नवीन जिंदल यांनी केला आहे. What did Sachin Waze reveal that Sharad Pawar’s stomach started hurting, Naveen Jindal’s question


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: सचिन वाझेंनी एनआयएसमोर असा कोणता खुलासा केला की, शरद पवार यांच्या अचानक पोटात दुखायला लागले आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागले, असा सवाल दिल्लीतील भाजपचे मीडिया प्रमुख नवीन जिंदल यांनी केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना अचानक पित्ताशयाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सचिन वाझे यांनी राष्ट्रीय तपास यंत्रणेला असे काय सांगितले की, शरद पवारांच्या पोटात दुखायला लागले, अशी टीका केली जात आहे.जिंदल म्हणाले, शरद पवारांच्या अचानक पोटदुखीमुळे पश्चिम बंगालच्या आधी महाराष्ट्रातच सत्तांतर होईल असे वाटू लागले आहे. सचिन वाझेंनी एनआयएसमोर असा कोणता खुलासा केला की, शरद पवार यांच्या अचानक पोटात दुखायला लागले आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागले. दाल में कुछ काला नहीं बल्कि पूरी की पूरी दाल ही काली है, असे वाटायला लागले आहे, असे ट्विट जिंदल यांनी केले आहे.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ आणि मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणात राष्टीय तपास यंत्रणेने (एनआयए) सहाय्यक पोलीस निरिक्षक सचिन वाझे यांना अटक केली आहे. एनआयएकडून कसून तपास केला जात आहे. अटक झाल्यापासून सचिन वाझे दररोज नवनवीन खुलासे करत आहे.

सचिन वाझे याचे सतरा वर्षांचे निलंबन रद्द करून पुन्हा पोलीस सेवेत घेण्यात आले होते. गुप्तचर विभागाचे प्रमुख केले होते. अंबानींच्या घरासमोर स्फोटके ठेवल्याच्या प्रकरणाचा तपासही वाझेकडे देण्यात आला होता. मनसुख हिरेन यांच्या मृत्यूनंतरही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वाझे यांचे समर्थन केले होते.

What did Sachin Waze reveal that Sharad Pawar’s stomach started hurting, Naveen Jindal’s question

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*