WATCH : शिवसेना भवनावर हल्ला करण्याची कोणाची हिंमत नाही – खा. संजय राऊत


MP Sanjay Raut : मुंबईत काल भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेना भवनावर काढलेल्या निषेध मोर्चावेळी शिवसैनिक व भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. या घटनेवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राऊत म्हणाले की, शिवसेना भवनावर हल्ला करण्याची हिम्मत कोणाची नाही, काल आलेले लोक कशासाठी आले होते? त्यांचा संबंध काय? शिवसेना भवन महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक आहे, त्यावर चाल करण्याचा प्रयत्न केला तर मराठी माणूस गप्प बसेल का? राऊत पुढे म्हणाले की, ज्यांना लिहिता वाचता येतं त्यांनी तपासून पाहावं. आमचे प्रवक्ते काय बोलले, सामनात काय छापलं ते बघावं. जे आरोप झाले त्यांची चौकशी करा, आरोप बदनाम करण्यासाठी केले असतील त्यावरही कारवाई करा, असे आम्ही म्हणालो. त्यावर मिरच्या का झोंबाव्या? राम मंदिरावर बीजेपीचे कार्यकर्ते आहेत का? खुलासा विचारणे गुन्हा आहे का? ज्यांनी काल प्रयत्न केला त्यांना शिवसैनिकांनी प्रसाद दिला आहे, आता संपूर्ण शिवभोजन थळी द्यायला लावू नका. कोल्हापुरातील मराठा आरक्षण आंदोलनानंतर खा. संभाजीराजेंना मुख्यमंत्र्यांनी चर्चेसाठी बोलावलं आहे. त्यावर बोलताना राऊत म्हणाले की, आज संध्याकाळी भेट आहे , 2 प्रमुख लोक चर्चा करतील, चर्चा व्हायला हवी, चर्चेतूनच प्रश्न सुटतील. ओबीसी आरक्षणाच्या आंदोलनावर प्रश्न विचारताच राऊत म्हणाले की, आरक्षण विषय नाजूक झालाय, आरक्षणाबाबतीत एक राष्ट्रीय धोरण केंद्र सरकारला बनवावे लागेल, म्हणून मुख्यमंत्री पंतप्रधान यांना भेटले होते, आता त्यांना निर्णय घ्यावा लागेल. शिवसेनेकडून विधानसभा निवडणूक लढवणारे एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्या घरी एनआयएने छापे टाकले. यावर प्रश्न विचारताच राऊत म्हणाले की, आम्ही माहिती घेत आहोत. केंद्रीय संस्था सारख्या सारख्या येथे येतात. पोलिसी कारवाई असेल, मला माहिती नाही. यासंदर्भात गृहमंत्री, पोलीस आयुक्त बोलू शकतील, त्या विषयी मला माहीत नाही, मी कसे बोलणार? Watch Shiv Sena MP Sanjay Raut comment On BJP Shiv Sena Clash in Mumbai

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात