शिवसेनेच्या लाडक्या वाधवान बंधूंच्या नातेवाईकांची गुंतवणूक असल्यामुळेच ड्रीम मॉलला वरदहस्त का? अतुल भातखळकर यांचा सवाल

भांडुप येथील ड्रीम मॉल मधील सनराइज कोविड सेंटरला लागलेल्या आग प्रकरणी तेथे अनधिकृतपणे कोविड सेंटर उभे राहते याची साधी माहिती सुद्धा महानगरपालिकेला नाही. स्वतः महापौर हे कबूल करतात.या ड्रीम मॉलमध्ये पीएमसी बँक घोटाळ्याचे सूत्रधार असलेल्या वाधवान बंधूंच्या नातेवाईकांची गुंतवणूक आहे. त्यामुळेच शिवसेनेने या मॉल वर व अनधिकृतपणे उभे राहिलेल्या या सनराईज हॉस्पिटल वर कारवाई करण्यास टाळाटाळ केली आहे काय? असा सवाल भारतीय जनता पक्षाचे आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे.Vadhavan brothers relative has stars in Dream Moll, that why Shivsena give permission to hospital


विशेष प्रतिनिधी 

मुंबई : भांडुप येथील ड्रीम मॉल मधील सनराइज कोविड सेंटरला लागलेल्या आग प्रकरणी तेथे अनधिकृतपणे कोविड सेंटर उभे राहते याची साधी माहिती सुद्धा महानगरपालिकेला नाही. स्वतः महापौर हे कबूल करतात.

या ड्रीम मॉलमध्ये पीएमसी बँक घोटाळ्याचे सूत्रधार असलेल्या वाधवान बंधूंच्या नातेवाईकांची गुंतवणूक आहे. त्यामुळेच शिवसेनेने या मॉल वर व अनधिकृतपणे उभे राहिलेल्या या सनराईज हॉस्पिटल वर कारवाई करण्यास टाळाटाळ केली आहे काय? असा सवाल भारतीय जनता पक्षाचे आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे.मॉल व हॉस्पिटल च्या संचालक व व्यवस्थापकीय मंडळासोबतच हा मॉल व हॉस्पिटल बेकायदेशीरपणे सुरू ठेवण्यासाठी वरदहस्त असलेल्यांचीही सखोल चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

डिसेंबर महिन्यात भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीत दहा बालकांचा होरपळून मृत्यू झाल्यानंतर मुंबईतील सर्व खाजगी व सरकारी रुग्णालयांचे फायर ऑडिट करून घेण्यासाठीची वारंवार मागणी मी केली होती. त्यावेळी उघड झालेल्या माहितीत मुंबईमध्ये 1390 रुग्णालये व नर्सिंग होम अनधिकृतपणे सुरू आहेत तेथे कोणत्याही प्रकारची आगरोधक सुरक्षा नसल्याचे समोर आले होते.

महानगरपालिकेकडून फेब्रुवारी महिन्यात करण्यात झालेल्या एका सर्व्हेनुसार 29 मॉलमध्ये अग्नी सुरक्षा व्यवस्था कुचकामी असल्याचे समोर आले होते. ज्या ड्रीम मॉलला आग लागली त्याचा सुद्धा या यादीत समावेश होता.

या आगीत दुर्दैवी मृत्यू झालेल्याच्या नातेवाईकांना २५ लाख रुपयांची थेट आर्थिक मदत करण्यात यावी. ही रक्कम मॉल व रुग्णालयाकडून वसूल करावी अशी मागणी आमदार भातखळकर यांनी केली आहे.

Vadhavan brothers relative has stars in Dream Moll, that why Shivsena give permission to hospital

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*