गुलाबी गाव भिंतघरमध्ये जनकल्याण गोशाळेत गो आधारित उत्पादनांचे प्रशिक्षण; शेतकरी गो पालकांचा उस्फूर्त प्रतिसाद


विशेष प्रतिनिधी

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील गुलाबी गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या भिंतघर येथे जनकल्याण गोशाळेत गाईवर आधारित विविध उत्पादनांचे दोन दिवसांचे प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. याला नाशिक जिल्ह्यातून शेतकरी गो पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. Training of cow based products at Janakalyan Goshala in Pink Village Wall; Spontaneous response from farmers and parents

गुलाबी गाव भिंतघर येथे जनकल्याण गोशाळेमार्फत हे दिवसांचे गो आधारित उदपादने प्रशिक्षण देण्यात आले. या कार्यक्रमाला नाशिक तपोवन जनार्दन स्वामी मठातील स्वामींचे शिष्य संतोषगिरी महाराज हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते प्रशिक्षण घेणाऱ्या सर्व शेतकरी गो पालकांना विशेष प्रमाणपत्र देण्यात आले. सुरगाणा तालुक्यातील स्वामींचे शिष्य काशिनाथ बाबा हे प्रशिक्षण कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. तसेच तालुक्यातील त्याचे सर्व भक्तगण कार्यक्रमाला हजर होते.



रघुनाथ जाधव यांनी गुलाबी गाव भिंतघरची सविस्तर माहिती सांगितली. पोपटी काकांनी गो शाळेची माहिती दिली. गोशाळेतील सर्व प्रकारची कामे गावातील विद्यार्थी आपापसात वाटून घेऊन करत असतात हे त्यांनी आवर्जून स्पष्ट केले. संतोषगिरी महाराजांनी गाईचे अध्यात्मिक आणि आरोग्य विषयक महत्त्व सांगितले. मुलांनी योगासन प्रात्यक्षिके दाखविली. या कार्यक्रमाला गावातील पोलीस पाटील तुळशीराम जाधव, हरी गांगुर्डे, मोतीराम गांगुर्डे, महेंद्र बारे आणि सर्व गावकरी हजर होते.

Training of cow based products at Janakalyan Goshala in Pink Village Wall; Spontaneous response from farmers and parents

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात