हे लोकप्रतिनिधी ? कोरोना रोखणार की पसरवणार..हा कसला जल्लोष ? ही कसली मिरवणूक ? इम्तियाज जलील यांचा ‘जश्न- ए- लॉकडाउन ‘


  • औरंगाबादसह जिल्ह्यात कोरोनाचे रुग्णसंख्या वाढत असताना मंगळवारी लाॅकडाऊन रद्द झाल्याचा जल्लोष खासदार जलील यांनी समर्थकांसह केला. यावेळी कोरोनाचे सर्व नियम धाब्यावर बसवण्यात आले होते.
  • जमावबंदी आदेशाचं उल्लंघन करुन काल इम्तियाज जलील यांनी जल्लोष केला 

विशेष प्रतिनिधी

औरंगाबाद: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी औरंगाबादमध्ये ३१ मार्चपासून सुरू होणारा लॉकडाऊन रद्द करण्यात आला आहे. औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी याबद्दलची माहिती दिली. जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्तांसोबत पत्रकार परिषद घेत लॉकडाऊन रद्द करत असल्याची घोषणा केली. This people’s representative? Corona will stop or spread..what kind of glory is this? What kind of procession is this? Imtiaz Jalil’s ‘Jashn-e-Lockdown’

औरंगाबाद जिल्ह्यात लॉकडाऊन रद्द करण्याचा निर्णय जाहीर झाल्यानंतर एमआयएमचे खासदार  इम्तियाज जलील यांच्या समर्थकांनी इम्तियाज जलील यांच्या ऑफिससमोर मोठी गर्दी करत जल्लोष केला. यावेळी कार्यकर्त्यांनी इम्तियाज जलील यांना पुष्पहार घालून रस्त्यावर मिरवणूक सुद्धा काढली होती. इम्तियाज जलील यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांना कोरोनाचा विसर पडला.

नेमकं काय घडलं?

औरंगाबादमधील लॉकडाऊनचा निर्णय रद्द होताच इम्तियाज जलील यांच्या समर्थकांनी इम्तियाज जलील यांच्या ऑफिससमोर मोठी गर्दी करत जल्लोष केला. यावेळी कार्यकर्त्यांनी इम्तियाज जलील यांना पुष्पहार घालून रस्त्यावर मिरवणूक सुद्धा काढली होती.

इम्तियाज जलील यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांना कोरोनाचा विसर पडला होता. एकीकडे औरंगाबाद शहरात कोरोनाची रुग्णसंख्या हजारांच्या घरात गेली असताना आणि मृतांचा आकडा थेट चाळीसवर पोहोचला असताना, खुद्द खासदार इम्तियाज जलील आणि त्यांच्या समर्थकांनी केलेला जल्लोष धोकादायक समजला जात आहे.

उच्चशिक्षित खासदार आणि तुमचे कार्यकर्ते कायद्याला खांद्यावर नाचवत वेशीला टांगत होते. डिस्टंसिंगचे बारा वाजवलेच पण चुकून एकही कार्यकर्ता मास्क घातलेला नव्हता. खासदार साहेब, ‘याची साठी केला होता का अट्टहास ?’ ‘लाॅकडाऊन नको, लोकांवर कडक कारवाई करा’, असं म्हणता ना ? आता सांगा कोणावर करायची कारवाई ? काय साध्य करताय यातून ?असा सवाल औरंगाबादची जनता करत आहे.

 

This people’s representative? Corona will stop or spread..what kind of glory is this? What kind of procession is this? Imtiaz Jalil’s ‘Jashn-e-Lockdown’

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था