ठाकरे सरकारचा रडीचा डाव, आता फडणवीस सरकारच्या काळातील राजकीय शिफारसींमुळे बदल्यांची यादी जाहीर करणार

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस दलातील बदल्यांचे प्रकरण काढल्यानंतर आता ठाकरे सरकार रडीचा डाव खेळू लागले आहे. फडणवीस सरकारच्या काळात किती पोलीसांच्या राजकीय शिफारसींमुळे बदल्या झाल्या याची माहिती जाहीर करणार आहे. परंतु, राजरोसपणे पत्र देऊन बदल्यांची शिफारस केलेली असताना यातून सरकार काय सिध्द करणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. The Thackeray government’s radish innings, will now announce the list of transfers due to the political recommendations of the Fadnavis government


विशेष प्रतिनिधी

मुंबई: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस दलातील बदल्यांचे प्रकरण काढल्यानंतर आता ठाकरे सरकार रडीचा डाव खेळू लागले आहे. फडणवीस सरकारच्या काळात किती पोलीसांच्या राजकीय शिफारसींमुळे बदल्या झाल्या याची माहिती जाहीर करणार आहे. परंतु, राजरोसपणे पत्र देऊन बदल्यांची शिफारस केलेली असताना यातून सरकार काय सिध्द करणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.



 

पोलिसांच्या बदल्यांमध्ये राजकीय हस्तक्षेप झाल्याचा आरोप करत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यासाठी देवेंद्र फडणवीस आपल्याकडे पुरावे देखील असल्याचे सांगत आहे. यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता फडणवीस सरकारच्या काळातील बदल्यांची चौकशी करण्याची तयारी केली आहे.
लोकशाही व्यवस्थेत लोकप्रतिनिधीकडे सातत्याने लोक येत असतात. आपली कामे मार्गी लावण्याची मागणी करतात. त्याप्रमाणे लोकप्रतिधिनी पत्रेही देत असतात. याच पध्दतीने पत्रे बदल्यांसाठीही दिली जातात. परंतु, ठाकरे सरकारने ही पत्रेही जाहीर करण्याची धमकी दिली आहे.

भारतीय जनता पक्षाचे सरकार असताना सन २०१४ ते २०१९ या कालावधीत राजकीय शिफारशीमुळे झालेल्या पोलिस अधिकाºयांच बदल्यांची यादी तयार करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृह मंत्रालय आणि पोलिस मुख्यालयाला दिले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आणि शिवसेनेतील नेत्यांनी पैशांच्या बदल्यात पोलिसांच्या बदल्या केल्याचा आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी दिलेला रिपोर्ट दाखवत देत देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला होता. या बाबतची काही कागदपत्रे सार्वजनिक करत तत्कालीन पोलिस महासंचालक राजकीय हस्तक्षेपामुळे कसे दिल्लीला निघून गेल्याचे फडणवीस यांनी म्हटले होते. त्यानंतर केंद्रीय गृह सचिवांची भेट घेऊन फडणवीस यांनी हे पुरावे त्यांना सादर केले आहेत. त्यानंतर मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देखमुख यांच्यावर दरमहा १०० कोटी रुपये वसुलीचे काम सचिन वाझे यांना दिल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. त्यानंतर राज्याच्या राजकीय वतुर्ळात वादळ निर्माण झाले आहे.

The Thackeray government’s radish innings, will now announce the list of transfers due to the political recommendations of the Fadnavis government

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*