एसटी महामंडळ पुरविणार खासगी बसना संरक्षण, प्रवाशी मिळण्याची हमीही देणार


विशेष प्रतिनिधी

पुणे : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर खासगी वाहतुकदारांना प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, अनेक ठिकाणी त्यांच्यावर दगडफेक झाली आहे. त्याचबरोबर प्रवासी मिळण्यातही अडचणी येत आहेत. त्यामुळे आता एसटी महामंडळ खासगी बसना संरक्षण देणार आहे.The ST Corporation will provide private bus protection, guaranteeing access to passengers

त्याचबरोबर प्रवाशी मिळण्याची हमीही देणार आहेत.राज्य सरकारने केलेल्या आवाहनानुसार, खाजगी बस संघटनेने राज्यातील प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून दोन हजार बस राज्यातील विविध स्टँडवरून सोडल्या.



परंतु, एसटी प्रशासन अधिकारी, स्थानिक पोलिस अधिकारी यांच्याकडून सहकार्य न मिळाल्यामुळे बस विना प्रवासी परत आल्या. यामुळे खासगी वाहतूकदारांचे नुकसान झाले. आठ ते दहा ठिकाणी खासगी बसेसवर दगडफेक करण्यात आली वर ड्रायव्हर चालकांना मारण्यात आले.

याबाबत गुरूवारी सकाळी दहा वाजल्यापासून पुणे व राज्यातील इतर ठिकाणी खाजगी बस एसटीचा आवारातून न सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर परिवहन मंत्री अनिल परब साहेब यांच्यासोबत सर्व संघटनांचे प्रतिनिधी व अधिकाऱ्यांची बैठक झाली.

पोलीस महासंचालक, परिवहन आयुक्त, एसटीचे संचालकही उपस्थित होते. यावेळी खासगी बसना आणि चालकांना सुरक्षा देण्याची हमी परब यांनी दिली. त्यामुळे राज्यातील सर्व बसेस खाजगी बस दुपारनंतर चालू करण्यात आल्या. त्याचबरोबर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आरटीओ नोडल ऑफिसर यांची नेमणूक करण्यात येणार आहे.

दरम्यान याबाबत खासगी वाहतूकदार संघटनेने एसटी कर्मचाºयांच्या संपाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे एसटी आगारातून खासगी बस सोडायच्या नाहीत असा निर्णय घेतला आहे.

The ST Corporation will provide private bus protection, guaranteeing access to passengers

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात