कृष्णा – भीमा स्थिरीकरण प्रकल्प शरद पवारांनी होऊ दिला नाही; भाजप खासदार रणजितसिंह निंबाळकरांचा गंभीर आरोप; प्रकल्प मार्गी लावण्यासाठी मोंदीना भेटणार

प्रतिनिधी

नवी दिल्ली : दुष्काळी तालुक्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला कृष्णा – भीमा स्थिरीकरण प्रकल्प ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी होऊ दिला नाही, असा गंभीर आरोप भाजप खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी केला आहे.The Krishna-Bhima stabilisation project stalled by sharad pawar only for political gains; allaged MP ranjitsingh nimbalkar

केंद्र सरकारने सन २०११ पासून तयारी दाखवूनही त्याला पवारांच्या नेतृत्वाखालील त्यावेळच्या सरकारने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे हा प्रकल्प थंड बासनात आहे, असा आरोपही रणजितसिंह निंबाळकर यांनी केला आहे. केंद्रीय टास्क फोर्सच्या सदस्यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी पवारांच्या आणि आधीच्या काँग्रेस – राष्ट्रवादीच्या सरकारवर सडकून टीका केली.रणजितसिंह निंबाळकर म्हणाले, केंद्रातल्या यूपीए सरकारने सन २०११ मध्ये राज्याला पत्र पाठविले. तत्कालीन कृषिमंत्री आणि माढ्याचे खासदार शरद पवार यांच्याकडून सरकारला सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. तसेच महाराष्ट्राचे त्यावेळचे जलसंपदा मंत्री रामराजे निंबाळकर यांनी देखील प्रतिसाद दिला नाही. केवळ निवडणुकीसाठी या मुद्द्यांचा वापर केला.

कृष्णा – भीमा स्थिरीकरण प्रकल्प मार्गी लावण्यासाठी भाजपचे शिष्टमंडळ माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार असल्याचे रणजितसिंह निंबाळकर यांनी सांगितले.

ते म्हणाले की, कृष्णा भीमा स्थिरीकरण प्रकल्प काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात तयार करण्यात आला. केंद्राने प्री फिजिबलिटी रिपोर्ट २०११ मध्ये राज्य सरकारला पाठविला. त्यानंतर दोन ते तीन वेळा केंद्राने राज्याला सहकार्य करण्यासंदर्भात तयारी दर्शविली.

केंद्र सरकारने अनुकूलता दर्शविली होती. परंतु राज्याने प्रतिसाद दिला नाही, असं निंबाळकर म्हणाले.

सांगोला आणि माण तालुक्यासाठी पाणी पुरवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. परंतु, पाण्याच्या प्रश्नावर निवडणुका लांबविण्यासाठी शरद पवारांनी या प्रकल्पाचा वापर केला. या प्रकल्पाला १६ हजार कोटी रुपये खर्च लागणार आहे. त्यातला ४० टक्के खर्च राज्य सरकार करणार होते तर ६० टक्के खर्च केंद्र सरकार करणार होत, अशी माहितीही त्यांनी दिली.

The Krishna-Bhima stabilisation project stalled by sharad pawar only for political gains; allaged MP ranjitsingh nimbalkar

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*