उत्तरेत उष्णतेच्या लाटेने राज्ये होरपळली; महाराष्ट्रालाही चटके: पाऱ्याची उसळी


वृत्तसंस्था

मुंबई : उत्तर भारतातील अनेक राज्ये उष्णतेने होरपळत आहेत. आता महाराष्ट्रालाही लाटांचे चटके बसत असून पाऱ्याने उसळी घेतली आहे. पुढील पाच दिवस महाराष्ट्रात काही ठिकाणी उष्णतेची लाट येईल, अशी माहिती भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिली. शिवाय पश्चिमी हिमालय क्षेत्र, गुजरातमधील काही भाग, मध्य प्रदेश, राजस्थान, पंजाब, हरियाणा, बिहार, झारखंड या राज्यांना उष्णतेच्या लाटेचा फटका बसेल, असेही सांगितले. The heat waves ruled in North india; increasing more in 5 days



कोकणात पावसाचे शिंतोडे

गेल्या २४ तासात मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली. कोकण, गोवा, मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे होते. विदर्भात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली. मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी, कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी किंचित वाढ झाली आहे.

कोणत्या जिल्ह्यांना लाटेचा फटका बसणार

बुलडाणा, अकोला, जळगाव, हिंगोली, औरंगाबाद, अहमदनगर, जालना, परभणी, यवतमाळ, अमरावती.

The heat waves ruled in North india; increasing more in 5 days

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात