जयदेव जयदेव जय मंगलमूर्ती; उत्सवाची वाट लागली हो पुरती…!!; सलग दुसऱ्या वर्षी गणेशोत्सवावर कोरोना बंधने


प्रतिनिधी

मुंबई – जयदेव जयदेव जय मंगलमूर्ती; उत्सवाची वाट लागली हो पुरती…!!; असे म्हणायची वेळ सलग दुसऱ्या वर्षी गणेशभक्तांवर आली आहे. कारण ठाकरे – पवार सरकारने सार्वजनिक गणेशोत्सवावर कोरोना बंधने लादली आहेत. thackeray – pawar govt ristrictes ganesh festival; issues new guide lines

कोरोनाच्या संकटामुळे गेल्या वर्षी गणेशभक्तांच्या आनंदावर विरजण पडले होतेच. ते अजून हटलेले नाही. उलट यंदा ते आनंदावर पडलेले विरजण जास्त आंबट झाले आहे. गणेशोत्सव जल्लोषात आणि नेहमीच्या थाटात साजरा होईल, अशी आशा होती. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं त्यावर पाणी फेरले आहे. ठाकरे – पवार सरकारने गणेशोत्सवासाठी नवी नियमावली जारी करून त्यामध्ये निर्बंधांची जंत्री दिली आहे.

सार्वजनिक गणेशमूर्तीसाठी ४ फूट, तर घरगुती गणेशमूर्तीसाठी २ फुटांची मर्यादा घातली आहे. गेल्यावर्षी ठीक होते. पण यंदा गणेशमूर्तीच्या उंचीवर बंधने नकोत, अशी भूमिका गणेश मूर्तीकार आणि सार्वजनिक मंडळांनी घेतली आहे. मात्र, ती ठाकरे – पवार सरकारने मानलेली दिसत नाही.

सार्वजनिक गणेशोत्सवाची नवी नियमावली –

  • गणेशोत्सवासाठी मंडळांनी महापालिका वा स्थानिक प्रशासनाची परवानगी घेणे आवश्यक असेल.
  • कोरोनामुळे महापालिका वा स्थानिक प्रशासनाने ठरवलेल्या धोरणानुसार मर्यादित स्वरूपातच मंडप उभारण्यात यावा. गणेशोत्सव साधेपणाने साजरा करणं अपेक्षित असल्याने भपकेबाज सजावट करणे टाळावे.
  • आगमन आणि विसर्जन मिरवणुका काढू नये. विसर्जन स्थळी करण्यात येणारी आरती घरीच करावी. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी विसर्जन स्थळी जाणे टाळावे. चाळीतील आणि इमारतीतील गणेशमूर्तींच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्र काढू नयेत.
  • सार्वजनिक गणेश मंडळातील मूर्तीची उंची ४ फूट आणि घरातील मूर्तीची उंची २ फुटांपेक्षा जास्त उंच नसावी.
  • शक्यतो माती आणि प्लॅस्टरच्या गणेशमूर्तीऐवजी धातूच्या किंवा संगमरवरी मूर्तीचे पूजन करावे. शक्यतोवर घरच्या घरी मूर्तीचं विसर्जन करावं. ते शक्य नसल्यास जवळच्या कृत्रिम विसर्जनस्थळी मूर्ती विसर्जित करावी.
  • स्वच्छेने दिलेल्या देणग्याच स्वीकाराव्यात. जाहिरातींमुळे गर्दी होणार नाही, याची काळजी घ्यावी. आरोग्य विषयक आणि सामाजिक संदेश देणाऱ्या जाहिराती करण्याला प्राधान्यक्रम द्यावा.
  • सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्यविषयक उपक्रम आणि शिबिरे घेण्याला प्राधान्य देण्यात यावे. स्वच्छतेबाबत जनजागृती करावी.
  • राज्य सरकारने लागू केलेले निर्बंध गणेशोत्सवातही कायम असतील. शिथिल केले जाणार नाहीत.
  • आरती, भजन, किर्तन वा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही, याची काळजी घ्यावी. ध्वनी प्रदुषणासंदर्भातील नियमांचे पालन करण्यात यावे.
  • नागरिकांची गर्दी होऊ नये या अनुषंगाने गणेशाचे दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्किंग, वेबसाईट, फेसबुक इत्यादीद्वारे उपलब्ध करुन देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करावी.
  • गणपती मंडपात निर्जंतुकीकरण आणि थर्मल स्क्रिनिंगची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी.
  • महापालिका, विविध मंडळं, गृहनिर्माण संस्था, लोक प्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था यांच्या मदतीने गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात यावी.
  • करोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारसह, आरोग्य विभाग, महापालिका प्रशासन, स्थानिक पोलीस प्रशासन यांनी ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करावे.

thackeray – pawar govt ristrictes ganesh festival; issues new guide lines

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात