Thackeray – Pawar Feud : शिवसेनेने आदळआपट करूनही शरद पवार गृह मंत्रालय सहजासहजी सोडतील…??, की शिवसेनेलाच सुरुंग लावतील…??


राष्ट्रवादीचे गृहमंत्री अनिल देशमुख शंभर कोटींच्या खंडणी प्रकरणात सीबीआयच्या ताब्यात नवाब मलिक ईडीच्या न्यायालयीन कोठडीत त्यांच्यावर टेरर फंडिंग केसची टांगती तलवार… हसन मुश्रीफ, श्रीधर पाटणकर अनिल परब हे ईडी कारवाईच्या पंजात अशा पद्धतीने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या विरोधात केंद्रीय तपास संस्थांचा फास आवळत चालला असताना शिवसेनेने धडपडाट करून राष्ट्रवादीच्या गृहमंत्र्यांवर आगपाखड केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे तक्रार करून आठवडा उलटून गेला आहे. त्यामुळेच आता शिवसेनेने थेट राष्ट्रवादी कडील गृह मंत्रालयच मुख्यमंत्र्यांच्या ताब्यात घेण्याचा घाट घातला आहे… पण जे शरद पवार गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांना आपल्या घरी बोलवून त्यांची बैठक घेतात. त्यांच्याकडून रिपोर्टिंग घेतात, ते शरद पवार सहजासहजी राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेले गृहमंत्रालय सोडतील ही सुतराम शक्यता नाही…!!Thackeray – Pawar Feud: Sharad Pawar will leave Home Ministry easily despite Shiv Sena clash

ज्यासाठी शरद पवारांनी भाजपची महत्त्वाकांक्षा मोडून ठाकरे – पवार सरकार अस्तित्वात आणले ते स्वतःहून गृहमंत्री पद सोडून देतील ही शक्यता अजिबात नसताना शिवसेनेने कोणत्या आधारावर गृह मंत्रालयाची मागणी चालवली आहे…??

– शिवसेना नेतृत्व हिंमत दाखवत नाही

निधी वाटपात उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री उघडपणे शिवसेनेच्या आमदारांवर अन्याय करतात. शिवसेनेचे महाविकास आघाडीत सर्वाधिक आमदार असून सर्वात कमी निधी देतात. त्या वेळी शिवसेनेचे नेतृत्व अतिवरिष्ठ नेतृत्व तोडगा काढू शकत नाही. निधी शिवसेनेच्या आमदारांकडे वळवू शकत नाही. पण आता मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्या पर्यंत म्हणजे सौ रश्मी ठाकरे यांच्या बंधून पर्यंत ईडी तपासाचा फास आवळला गेल्यानंतर खडबडून जागे झालेल्या शिवसेनेने आता गृहमंत्रालय आपल्या ताब्यात घेण्याचा मनसूबा रचला आहे. पण जे शरद पवार अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या राजीनाम्याने अटकेनंतरही देखील विचलित झाले नाहीत, अजित पवारांच्या जरंडेश्वर कारखान्यावर जप्तीची कारवाई झाली तरी देखील शरद पवार बधले नाहीत. ते शरद पवार इतक्या सहजासहजी गृहमंत्रालय शिवसेनेसाठी सोडतील ही शक्यता अजिबात नाही…!!



– उद्धव ठाकरे हिंमत दाखवतील का?

पण मग प्रश्न उरतो शिवसेनेचे अतिवरिष्ठ नेतृत्व तरी पवारांकडून महाराष्ट्राचे गृहमंत्रालय हिसकावून घेऊ शकतील का…?? तेवढी हिंमत, तेवढे राजकीय कर्तृत्व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दाखवू शकतील का…??

– पवार शिवसेनेलाच सुरुंग लावतील?

की शरद पवार आपल्या नेहमीच्या फोडाफोडीच्या चाली करून शिवसेनेलाच आतून सुरुंग लावून ठेवतील…?? आत्तापर्यंत शिवसेना आमदार आणि राष्ट्रवादी आमदार खासदारां मध्ये रस्त्यांवर धुमश्चक्री होत होती. पण आता ईडी आणि सीबीआयचा फास आवळला गेल्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी अतिवरिष्ठांमध्ये धुसफूस सुरू झाली आहे. यात शरद पवार हे सहजासहजी शिवसेना नेतृत्वाच्या मागण्या मान्य करतील का…?? आणि शरद पवारांनी मागण्या मान्य केल्या नाहीत तर शिवसेना नेतृत्व पवारांना देखील हिसका दाखवू शकेल का…?? हा कळीचा प्रश्न आहे.

Thackeray – Pawar Feud: Sharad Pawar will leave Home Ministry easily despite Shiv Sena clash

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात