ठाकरे – भाजप एकमेकांचे कपडे फाडण्यात मग्न; आत्मचरित्राच्या दुसऱ्या भागाद्वारे पवार नवा डाव खेळण्यास सज्ज!!


विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रात एकीकडे ठाकरे आणि भाजप एकमेकांचे कपडे फाडण्यात मग्न असताना दुसरीकडे आत्मचरित्राच्या दुसऱ्या भागाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार नवा डाव खेळण्यास सज्ज झाले आहेत. Thackeray – BJP on rampage over each other, sharad Pawar open new game through his autobiography

शरद पवारांच्या “लोक माझे सांगाती” या आत्मचरित्राचा दुसरा भाग 2 मे 2023 रोजी यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये प्रकाशित होत आहे. यानिमित्ताने मराठी माध्यमातून त्यांचे ब्रॅण्डिंग सुरू झाले आहे

शरद पवारांनी आत्मचरित्राच्या दुसऱ्या भागात शिवसेना – भाजप यांच्यात दुफळी निर्माण होणे हा आमच्यासाठी शुभसंकेत असल्याचे गौप्यस्फोट केला आहे. त्याचवेळी ठाकरे आणि भाजप आपल्या मधली दुफळी अधिक रूंदावण्याचे काम करीत आहेत. त्यासाठी संजय राऊत आणि नारायण राणे पुत्र नितेश राणे हे अनुक्रमे ठाकरे आणि भाजपकडून कामाला लागले आहेत. दोन्ही बाजू एकमेकांवर बेछूट आरोप करत सुटल्या आहेत. यात जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पासाठी नारायण राणे 250 कोटी रुपये घेऊन उद्धव ठाकरेंकडे आले होते. त्यांना लाथ मारून बाहेर काढले, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे, तर शरद पवारांमार्फत संजय राऊत स्वतःचेच घोडे मुख्यमंत्री पदासाठी पुढे दमट्यात असल्याचा दावा नितेश राणे यांनी केला आहे.

या पार्श्वभूमीवर शरद पवार यांचा आत्मचरित्राचा दुसरा भाग 2 मे रोजी प्रकाशित होत आहे. त्यामध्ये नेमकी शिवसेना भाजप यांच्यातल्या फुटी वरच त्यांनी भाषा करून राष्ट्रवादी आणि काँग्रेसला या फुटीमुळे कशी संधी मिळाली याचे सविस्तर वर्णन केले आहे. यावरून त्यांनी या वर्णनातून त्यांनी ठाकरे आणि भाजप यांचे मधील रुंदी भविष्यकाळातही कशी रुंदावेल यासाठीच नवा डाव टाकल्याचे ही स्पष्ट होत आहे.



भाजपला राजकीय वर्चस्वासाठी शिवसेनेचे उच्चाटन करायचे होते, असा दावा या पुस्तकातून शरद पवार यांनी केला आहे. शिवसेना आणि भाजपमध्ये 2019 मध्ये अंतर का वाढलं? याची माहिती देतानाच महाविकास आघाडीच्या जन्माची कहाणीही पवार यांनी पुस्तकात विशद केली आहे.

पवारांच्या पुस्तकात नेमकं काय म्हटलं?

राज्याच्या विधानसभा निवडणुकीत यापूर्वी शिवेसना 171 आणि भाजप 117 जागा लढत असे. पण 2019नंतर चित्रं बदललं. 2019मध्ये शिवसेनेने 124 जागा लढल्या, तर भाजपने 164 जागा पदरात पाडून घेतल्या. स्वत: च्या बळावर बहुमत मिळवत शिवसेनेचे ओझे उतरवून ठेवायचे असा चंग अतिआत्मविश्वासात दंग भाजपने बाळगला होता. नारायण राणे हे शिवसेनेच्या दृष्टीने गद्दार. पण भाजपमध्ये विलीन करून घेत शिवसेनेच्या जखमेवर मीठ चोळले. राज्यातील 50 मतदारसंघात बंडखोरांचे आव्हान होते. त्यातील बहुतेकांनी ठोकलेले दंड नेत्यांच्या आशीर्वादने आणि पक्षाच्या बळावर होते, असे पवारांनी नमूद केले आहे.

नरेंद्र मोदी आणि अमित शाह या दोन्ही नेत्यांच्या देहबोलीतून आणि बोलण्यातून शिवसेनेविषयी फारशी सहानुभूती नसल्याचे प्रतित होत होते. शिवसेनेच्या मात्र भाजपकडून अपेक्षा पूर्वीप्रमाणे कायम होत्या. भाजप आणि शिवसेना यांच्या संवादाची गरज असे तेव्हा शीर्षस्थ नेतृत्व मातोश्रीवर येऊन संवाद घडवत असे. पण बदलेल्या परिस्थितीत उद्धव ठाकरे यांची आणि शिवसेनेची भाजपच्या नेत्यांकडून मातोश्रीवर येऊन संवाद घडवावा हीच अपेक्षा कायम होती.

शिवसेनेची ताकद असलेल्या शहरी भागात तिचे उच्चाटन केल्याशिवाय आपल्याला राज्यात वर्चस्व स्थापन करण्यात येणार नाही असा सरळ राजकीय हिशोब भाजपचा होता. याचमुळे आपल्या राजकीय अस्तित्वावर भाजप उठला आहे, या विषयी शिवसेना नेतृत्व आणि त्यांच्या कार्यकर्त्यात तीव्र संताप होता. सत्तेत एकत्र असल्याने त्याचा उद्रेक झाला नाही. पण आग धुमसत होती, असं पुस्तकात नमूद करण्यात आलं आहे.

आणखी काय?

शरद पवार यांच्या राजकीय आत्मकथन असलेल्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाच्या दुसऱ्या भागाचं प्रकाशन 2 मे रोजी होणार आहे. शरद पवार यांच्याच उपस्थितीत वाय.बी. चव्हाण सेंटर येथे सकाळी 11.00 वाजता या पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे. या पुस्तकात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीवर भाष्य असण्याची शक्यता आहे, तसेच उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या अडीच वर्षाचा कार्यकाळावर भाष्य केले असल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय महाविकास आघाडीची जन्मकथाही या पुस्तकात सविस्तर मांडण्यात आली असावी, अशी अपेक्षा आहे.

Thackeray – BJP on rampage over each other, sharad Pawar open new game through his autobiography

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात