गृहमंत्र्यांवरील १०० कोटींच्या वसूलीचा आरोप गंभीरच; सीबीआय चौकशीची मागणी घेऊन हायकोर्टात का नाही जात?; सुप्रिम कोर्टाचा सवाल; परमवीर हायकोर्टात जाणार

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांवर १०० कोटींच्या वसूलीचा मुंबईच्या माजी पोलीस आयुक्तांनी केलेला आरोप गंभीरच आहे. पण मग परमवीर सिंग हे या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी घेऊन हायकोर्टात का नाही जात? असा सवाल सुप्रिम कोर्टाने परमवीर सिंगांच्या वतीने सुप्रिम कोर्टात याचिका दाखल केलेल्या ज्येष्ठ वकील मुकूल रोहटगी यांना केला.Supreme Court says that the allegations levelled by former Mumbai Police Commissioner against Maharashtra home minister is very serious

यावर परमवीर सिंगांच्या वतीने आपण ही याचिका मागे घेऊन मुंबई हायकोर्टात अपील करू, असे रोहटगी यांनी स्पष्ट केले. मात्र, या सगळ्या प्रकाराचे काही मराठी माध्यमातले रिपोर्टिंग परमवीर सिंगांची अनिल देशमुखांविरोधातील याचिका फेटाळली असे आले आहे. 

ते पूर्णतः चूकीचे असून प्रत्यक्षात गृहमंत्र्यांवर मुंबईच्या माजी पोलीस आयुक्तांनी लावलेले आरोप गंभीरच असल्याचे सुप्रिम कोर्टाने स्पष्टपणे नमूद केले आहे. परमवीर सिंगांना या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीच्या मागणीसाठी हायकोर्टात याचिका दाखल करायला मूभाच दिली आहे.

त्याचवेळी एका अत्यंत महत्त्वपूर्ण बाबीवर सुप्रिम कोर्टाने ताशेरे ओढले आहेत, ते म्हणजे पोलीस दलातील सुधारणा. जेव्हा राजकीय वातावरण तापते, तेव्हाच त्यावर बोलले जातेय!, अशा शब्दांमध्ये पोलीस सुधारणांमधील उदासीनतेबाबत सुप्रिम कोर्टाने राज्य सरकारांवर ताशेरे ओढले आहेत.

त्याचवेळी तक्रार जर महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याविरोधात आहे, तर त्यांना केसमध्ये पार्टी का नाही बनविले, असा सवाल सुप्रिम कोर्टाने केला. केस एन्टरटेन करायला सुप्रिम कोर्टाने नकार दिला. मात्र, परमवीर सिंग यांनी आपण सुप्रिम कोर्टातून याचिका मागे घेऊन हायकोर्टात याचिका दाखल करतो, हे सांगताच त्यांचे स्वातंत्र्य मान्य करीत सुप्रिम कोर्टाने संबंधित याचिका हायकोर्टात दाखल करण्याचीही मूभा दिली.

परमवीर सिंग यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खंडणीखोरीचा आरोप केला आहे. सचिन वाझेला अनिल देशमुखांनी आपल्याला असलेल्या १०० कोटींच्या टार्गेटपैकी ४० – ५० कोटी रूपये मुंबईतल्या १७५० बार – रेस्टॉरंटमधून प्रत्येकी २ – ३ लाख रूपये महिना गोळा करीत वसूल करायला सांगितले होते, याची माहिती सचिन वाझेने आपल्याला दिली होती, असा गंभीर आरोप केला आहे.

ही याचिका या सगळ्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यासंदर्भात होती.मात्र, आता सुप्रिम कोर्टाच्या सूचनेनुसार ही याचिका सुप्रिम कोर्टातून काढून घेऊन परमवीर सिंग ती मुंबई हायकोर्टात दाखल करणार आहेत.

Supreme Court says that the allegations levelled by former Mumbai Police Commissioner against Maharashtra home minister is very serious

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*