सुप्रीम कोर्टाच्या निकालातून लोकशाही आणि जनमताच्या कौलावरच शिक्कामोर्तब!!; शिंदे – फडणवीस सरकार स्थिर


प्रतिनिधी

मुंबई : सुप्रीम कोर्टाच्या अत्यंत महत्त्वाच्या निकालानंतर महाराष्ट्रातील राजकीय अस्थिरता संपून शिंदे – फडणवीस सरकार स्थिर झाले आहे, इतकेच नाही तर आत्तापर्यंत घटनाबाह्य सरकारचा ठपका लावणाऱ्या उद्धव ठाकरेंना सुप्रीम कोर्टाच्या निकालातून चपराक बसली आहे. उद्धव ठाकरे यांनी स्वतःच राजीनामा देणे देऊन पवारांच्या नियंत्रणाखालचे सरकार घालवले हे देखील सुप्रीम कोर्टाच्या आदेशातूनच स्पष्ट झाले आहे.Supreme Court dismissed bringing back MVA government in maharashtra

सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुप्रीम कोर्टाच्या निकालामुळे महाराष्ट्रात लोकशाहीचा आणि जनमताने दिलेल्या कौलाचा विजय झाला आहे, अशी महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.



सुप्रीम कोर्टाच्या निकालावर समाधान व्यक्त करतो. निश्चितपण लोकशाहीमध्ये लोकशाहीचा आणि लोकमताचा विजय झाला” असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. “हा जो काही निकाल आहे, त्यात चार-पाच महत्वाचे मुद्दे आहेत, त्याकडे लक्ष वेधू इच्छितो” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

देवेंद्र फडणवीस :

  •  महाविकास आघाडीच्या मनसुब्यावर सर्वोच्च न्यायालयाने पाणी फेरलय
  • पहिल्या सारखीस्थिती कायम ठेवता येणार नाही हे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलय. म्हणजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार नाहीत.
  •  त्या 16 आमदारांच्या अपात्रतेसंबंधी निर्णय देण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांकडेच.
  • निवडणूक आयोगाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु होता, तो चुकीचा आहे असं सुप्रीम कोर्टाने म्हटलय.

 आमच सरकार कायदेशीर आहे हे सिद्ध झालं आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, मी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला. मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे, आमच्यासोबत निवडून आलात. मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार बनवलं, त्यावेळी उद्धव ठाकरे नैतिकता कुठल्या डब्ब्यात बंद करुन ठेवली होती?, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला.

 एकनाथ शिंदे :

  • लोकशाहीत अपेक्षित निकाल लागला, सत्याचा विजय झाला
  • कायदेशीर बाबींची पूर्तता करुन सरकार स्थापन केलं. आज सुप्रीम कोर्टाने त्यावर शिक्कामोर्तब केलं.
  •  घटनाबाह्य सरकार म्हणणाऱ्यांना चपराक लगावली
  •  घटनाबाह्य सरकार म्हणणाऱ्यांना सुप्रीम कोर्टाने कालबाह्य केलं.
  •  आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार अध्यक्षांना दिला आहे.
  •  सरकार अल्पमतात आल्यामुळे आधीच्या मुख्यमंत्र्यांनी राजीना दिला.
  •  घटनात्मक बाबींची काळजी घेऊन सरकार स्थापन केलं.
  •  धनुष्यबाण वाचवण्याच काम आम्ही केलं.
  • धनुष्यबाण गहाण ठेवण्याचा काम तुम्ही केलं.
  •  सर्वोच्च न्यायालायच्या निर्णयाच मनापासून स्वागत करतो.

Supreme Court dismissed bringing back MVA government in maharashtra

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात