दोन दिवसांच्या लॉकडाऊन निर्णयाला पाठींबा, पण आरोग्य सुविधांकडे लक्ष द्यावं : देवेंद्र फडणवीस


वृत्तसंस्था

मुंबई : राज्यातील कोरोनाची परिस्थिती गंभीर होत चालली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दोन दिवसांचं विकेंड लॉकडाऊन आणि इतर दिवशी अंशतः लॉकडाऊन जाहीर केला आहे. या निर्णयाला आमचा पूर्णपणे पाठींबा आहे. राज्य सरकारच्या नियमांचे लोकांनी पालन करावे, असे आवाहन करतो, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली. भाजपच्या कार्यकर्त्यांनाही पाहिजे तिथे सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. Support the two-day lockdown decision, but pay attention to health facilities: Devendra Fadnavis

राज्यात रुग्णालयात खाटांची कमतरता भासत आहे. औषधांचा तुटवडा निर्माण आहे. यावरही सरकारने लक्ष द्यावे. लॉकडाऊनमध्ये सामान्यांचे खूप हाल होणार आहेत. त्यामुळे सरकारने तरतूद करावी, यासाठी बैठक घ्यावी, असे आवाहनही देवेंद्र फडणवीस यांनी केले.



कोरोनाला रोखण्यासाठी राज्यात लसीकरण होणे गरजेचे आहे. यासाठीही सरकारने विचार करण्याची गरज असल्याचे फडणवीस म्हणाले. यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी मदत करावी, असे आवाहन केलं. मधल्या काळात सरकार गाफिल राहिल्याने ही वेळ आली असल्याची टीकाही फडवणीस यांनी केली.

राज्य सरकार आपले अपयश झाकण्यासाठी दरवेळी केंद्र सरकारकडे बोट दाखवत असल्याचाही टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. केंद्राने राज्याला भरपूर मदत केली असून मी यापूर्वीच त्याची सविस्तर माहिती दिली असल्याचे त्यांनी सांगितले.

Support the two-day lockdown decision, but pay attention to health facilities: Devendra Fadnavis

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात