शरद पवार यांच्या बारामती निवासस्थानी सुरक्षेत वाढ;२ जणांना अटक


  • राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या बारामतीतील निवासस्थानी सुरक्षा अधिक वाढविण्यात आली आहे.

  • उजनी धरणातील पाच टीएमसी पाणी  इंदापूरला देण्याच्या  निर्णयामुळे आक्रमक झालेल्या सोलापूर जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केले आहे.

    Sudden increase in security at Sharad Pawar’s Baramati residence; 2 arrested


विशेष प्रतिनिधी

बारामती: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बारामतीतील गोविंदबाग या निवासस्थानी सुरक्षा वाढविण्यात आली आहे. उजनीच्या पाणी प्रश्नावरून सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी आंदोलन करणार आहेत  . त्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, अनेक आंदोलकांची सोलापूर जिल्ह्यात धरपकड करण्यात आली असून बारामतीत दोन आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलं .Sudden increase in security at Sharad Pawar’s Baramati residence; 2 arrested

उजनी धरणातील पाच टीएमसी पाणी  इंदापूरला देण्याच्या  निर्णयामुळे आक्रमक झालेल्या सोलापूर जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केले आहे. आज या आंदोलकांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या गोविंद निवासस्थानासमोर येत आपली भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र, यातील दोन आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले . दोन जणांना ताब्यात घेतले असले तरी आणखी ३५ जण या आंदोलनासाठी बारामतीत दाखल झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या बारामती येथील गोविंदबाग निवास स्थानासमोर पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

उजनीतून पाच टीएमसी पाणी इंदापूर तालुक्याला देण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता त्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील करमाळा माढा मोहोळ पंढरपूर तालुक्यातील शेतकरी संतप्त झाले होते.

पाणी देण्याचा निर्णय रद्द झालेले इंदापूर तालुक्यातील शेतकरी आक्रमक झालेले आहेत .रास्तारोको, मुंडन ,जलसमाधी, बोंबाबोंब, अर्धनग्न होवून आंदोलन ,जागरण गोंधळ , दंडवत असे आंदोलने इंदापूर तालुक्यात दररोज सुरू आहेत. दोनच दिवसांपूर्वी उजनी संघर्ष समितीच्या वतीने पंढरपूर (Pandharpur) तालुक्यातील उपरी येथे सातारा रस्त्यावर टायर पेटवून सरकारचा निषेध करण्यात आला होता. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली होती.

दरम्यान, बुधवारी सोलापूर जिल्ह्यातील काही शेतकरी खासदार शरद पवार यांच्या गोविंद बाग निवासस्थानासमोर आंदोलन करणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे येथील बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

उजनी धरणातून इंदापूरसाठी 5 टीएमसी पाणी देण्याचा निर्णय जलसंपदामंत्र्यांनी रद्द झाल्याचे सांगितल्यानंतरही उजनी बचाव संघर्ष समितीच्या वतीने आंदोलनाची तीव्रता वाढविण्यात आली होती. जोपर्यंत मुख्यमंत्री सही करून हा आदेश रद्द करत नाही तोपर्यंत जिल्हाभर आंदोलने सुरू ठेवणार असल्याचा इशारा संघर्ष समितीने दिला होता. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता शरद पवार यांच्या बारामतीतील घराची सुरक्षा वाढविण्यात आली आहे

बारामती – निरा रस्त्यावर वाहनचालकांची पोलिसांकडून तपासणी सुरू केली आहे. गोविंद बागेसमोर पोलिसांचा बंदोबस्त कायम आहे.

Sudden increase in security at Sharad Pawar’s Baramati residence; 2 arrested

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात