‘मी भाजपचा खासदार आहे, ईडी मागे लागणार नाही’ सांगलीत भाजप खासदार संजय काका पाटलांचे विधान


विशेष प्रतिनिधी

सांगली : काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील यांनी विधानसभा निवडणूकी पूर्वी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी केलेले एक वक्तव्य मोठा चर्चेचा विषय बनले होते. ‘मी भाजपमध्ये आल्यापासून ईडी वगैरेचा त्रास नसून, शांतपणे झोप लागते’ असे विधान हर्षवर्धन पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच केले होते. यावरून राजकीय वर्तुळामध्ये बऱयाच उलटसुलट प्रतिक्रिया देखील उमटल्या होत्या. आता भाजप पक्षातील आणखी एका खासदाराने ऑन कॅमेरा केलेल्या विधानामुळे सत्ताधारी पक्षांकडून आक्षेप घेतला जात आहे.

Statement of BJP MP Sanjay Kaka Patil in Sangli: ‘I am a BJP MP, ED will not be left behind’

सांगलीत झालेल्या एका कार्यक्रमात भाजप खासदार संजय काका पाटील यांनी आर्थिक गोष्टींवर मिश्कीलपणे बोलताना ईडीची कारवाई आणि भाजपाचा संरक्षण या आशयावर केलेले विधान सध्या चर्चेचा विषय ठरले आहे. ‘माझ्यामागे ईडी लागणार नाही, मी भाजपचा खासदार आहे. त्यामुळे ईडी इकडे येणार नाही’ असे संजयकाका पाटील म्हणाले आहेत. आणि आता त्यांच्या या विधानावर राज्यातील सत्ताधारी पक्षाकडून मोठा आक्षेप घेतला जात आहे.


भाजपा मध्ये आलो आता शांत झोप लागते चौकशी वगैरे काही नाही ; हर्षवर्धन पाटील


याच कार्यक्रमामध्ये पुढे बोलताना संजयकाका पाटील म्हणाले, आम्ही कर्ज काढून गाड्या खरेदी करतो. बँकेचं कर्ज काढून 40 लाखांची गाडी घेतो. मी वस्तुस्थिती मांडतोय. त्यामुळे कॅमेरासमोर रेकॉर्डिंग झाले तरी काही हरकत नाही. गमती गमतीमध्ये हर्षवर्धन पाटील म्हणाले होते की भाजपमध्ये आल्यापासून झोप चांगली लागते. तसं ईडीने आमची कर्ज बघितली तर इडी देखील म्हणेल की ही माणसे आहेत का काय? असे संजयकाका पाटील यावेळी म्हणाले होते.

शरद पवार आणि महाविकास आघाडीतील बऱ्याच नेत्यांनी केंद्रीय तपास यंत्रणांचा चुकीचा वापर केला जातोय. असा आरोप केन्द्र सरकारवर लावला होता. अशावेळी भाजप च्या दोन नेत्यांकडून अशी वक्तव्ये येणे, ह्या गोष्टी ह्या चर्चेला खतपाणी देण्याचे काम करत आहेत.

 

Statement of BJP MP Sanjay Kaka Patil in Sangli: ‘I am a BJP MP, ED will not be left behind’

 

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात