नव्या करकरीत ७०० बस खरेदी करणार, राज्य परिवहन महामंडळाने घेतला निर्णय


वृत्तसंस्था

पुणे : राज्य परिवहन महामंडळ (एसटी) नव्याकोऱ्या सातशे बस खरेदी करणार आहे, अशी माहिती राज्याचे परिवहनमंत्री,शिवसेना नेते अनिल परब यांनी दिली. State Transport Corporation has decided to purchase New 700 buses

साध्या, निमआराम आणि आरामदायी अशा तिन्ही प्रकारातील या गाड्या असतील. राज्य परिवहन महामंडळाच्या विविध कामांच्या पाहणीसाठी परब शुक्रवारी (ता.१८) पुण्यात आले होते. या वेळी परब म्हणाले की, महामंडळाचे उत्पन्न वाढवण्यासाठी सर्व डेपोतील पेट्रोल पंप सर्वांसाठी खुले करण्यात येणार आहेत. सध्या या डेपोवर महामंडळाच्या बससाठीच इंधन दिले जाते. त्यामुळे शासनाच्या विविध विभाग, खात्यांच्या गाड्या किंवा खासगी गाड्यांनाही डेपोवर पेट्रोल, डिझेल भरण्याची सुविधा देण्याचे नियोजन आहे. त्यातून महामंडळाला उत्पन्नाचे एक निश्चित साधन निर्माण होणार आहे.


पुणे महापालिका स्वतःच्या मालकीच्या विकणार दोन हजार सदनिका ; प्रथम येणाऱ्यास प्राधान्य


स्थानकावर मूलभूत सुविधा देणार

प्रत्येक एसटी बसस्थानकावर प्रवाशांना मूलभूत सुविधा देणार आहे. ‘हायफाय’ नाही पण, प्रत्येक स्थानकावर स्वच्छ पिण्याचे पाणी, आसन व्यवस्था आणि स्वच्छतागृह या मूलभूत सुविधा चांगल्या प्रकारे देण्यात येणार आहेत,असे परब म्हणाले.

State Transport Corporation has decided to purchase New 700 buses

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात