आधी टोल्यावर टोले, मग गळ्यात गळे!!; नाशिकच्या लग्न सोहळ्यात महाराष्ट्राच्या राजकारणाचे खास चित्र!!


प्रतिनिधी

नाशिक : राजकीय नेते राजकीय मुद्यांवरून एकमेकांवर भडकल्यावर किती आग ओकत असतात हे नेहमी पाहायला मिळते. पण हेच राजकीय नेते नंतर एकमेकांच्या गळ्यात गळे घालतानाही आपण पाहतो. हेच चित्र आज नाशिकच्या बिगर राजकीय मंचावर दिसले. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, महाराष्ट्राचे मंत्री छगन भुजबळ, शिवसेनेचे खासदार प्रवक्ते संजय राऊत हे एकमेकांवर जोरदार तिखट वार करत असतात पण आज भाजपच्या आमदार आणि प्रतोद देवयानी फरांदे यांच्या मुलीच्या लग्नाच्या निमित्ताने ते एकाच कोचावर बसून हास्यविनोद करताना दिसले. या सगळ्यांमध्ये मनमोकळ्या गप्पा झाल्याच्या बातम्या आहेत.Special picture of Maharashtra politics in Nashik wedding ceremony

संजय राऊत आणि चंद्रकांत पाटील यांच्यातही कधी भ्रष्टाचाराचे आरोप, कधी वैयक्तिक टीका पाहायला मिळाली. दुसरीकडे भुजबळ आणि राऊतांमध्येही खडाजंगी पाहायला मिळाली होती. मात्र, आज या तिन्ही नेत्यांमध्ये मनमोकळ्या गप्पाही झाल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय शुक्रवारी घेतला. त्यावरुन खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकार आणि मोदींवर जोरदार टोलेबाजी केली. तर चंद्रकात पाटील यांनी यांनी शेतकऱ्यांच्या आयुष्यात सूख आणि समृद्धी आणणारे तीन कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाईलाजाने आणि दुःखाने घेतला. पण त्यामुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान होणार आहे, अशी खंत व्यक्त केली.


कंगणाच्या महात्मा गांधींच्या विधानावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी काय आहे प्रतिक्रिया??


त्यावरुन संजय राऊत यांनी आज चंद्रकांत पाटलांवर खोचक टीका केली. माझा शोक संदेश चंद्रकांत पाटील यांना पाठवेन. त्यांच्यासाठी आपण शोकसभा घेऊ. देश उत्सव साजरा करत असेल तेव्हा जर कुणाला शोक वाटत असेल तर त्यांची मानसिकता तपासावी लागेल, अशा शब्दात संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला होता.

राऊत यांनी मागील दौऱ्यात नांदगावमध्ये असताना छगन भुजबळ यांना अंगावर घेण्याची भाषा केली होती. भुजबळांनीही राऊतांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले होते.

या टीका-टिप्पणीनंतर आज संजय राऊत, छगन भुजबळ आणि चंद्रकांत पाटील एकाच सोफ्यावर बसून गप्पा मारताना दिसले. भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांच्या मुलीचा विवाह सोहळा आज पार पडला. या सोहळ्याला छगन भुजबळ, चंद्रकांत पाटील, संजय राऊत यांच्यासह अनेक नेते मंडळी उपस्थित राहिली. यावेळी भुजबळ, पाटील आणि राऊत एकाच सोफ्यावर बसलेले पाहायला मिळाले. एका बाजूला पाटील, दुसऱ्या बाजूला राऊत आणि मधे भुजबळ बसले होते. यावेळी या तिन्ही नेत्यांमध्ये मनमोकळ्या गप्पा झाल्या.

पाटील, भुजबळ आणि राऊतांमध्ये मनमोकळ्या गप्पा सुरु असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकरही लग्न सोहळ्यात दाखल झाले. त्यावेळी राऊत यांनी उभे राहत फडणवीसांशी हस्तांदोलन केले आणि औपचारिक गप्पाही मारल्या. त्यामुळे एकीकडे नेतेमंडळींमध्ये राजकीय वाद आणि आरोप-प्रत्यारोप होत असले तरी हे नेते वैयक्तिक आयुष्यात चांगले संबंध जोपासून असतात, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले.

Special picture of Maharashtra politics in Nashik wedding ceremony

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात